लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती दिनानिमित्त जालना जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी गांधी चमन येथे महात्मा गांधी पुतळा येथे अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, ज्ञानेश्वर भांदरगे, डॉ. संजय लाखे पाटील, ज्ञानदेव बांगर, शेख महेमूद, गणेश राऊत, राजेंद्र राख, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, राम सावंत, वसंत जाधव, राधेश्याम जैस्वाल, भीमराव डोंगरे, मोहन इंगळे, शेख शमशू, नगरसेवक अरूण मगरे, बापू घायाळ, वैभव उगले, राजेंद्र गोरे, राजेश काळे, निळकंठ वायाळ, दत्ता शिंदे, शेषराव जाधव, शामराव लांडगे, इक्बाल कुरेशी, समाधान शेजूळ, महादेव घेमंड, विजय राठोड, प्रताप वाढेकर, श्रीमंत वाढेकर, शिवाजी वाढेकर, गणेश वाघमारे, शेख शकील, जॉर्ज उगले, साई जैस्वाल, विजय सोनवणे, मनोज गुडेकर, अॅड. सोपान भांदरगे, अफजल सौदागर, शेख खलील, रहीम तांबोळी, गोपाल चित्राल, प्रल्हाद बडगे, डॉ. भीमराव गावंडे, गजाजन काकडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले. यावेळी महिला सदस्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:48 AM