लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यांसह विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित विशेष सभेत पार पडली. सर्व सहा समित्यांवर सभापतीपदी महिला सदस्यांची बिनविरोध निवड झाली. तीन समित्यांवर काँग्रेसच्या तर दोन समित्यांवर राष्ट्रवादीच्या सदस्यांची वर्णी लागली.सुरुवातीला विषय समित्यांच्या सदस्यपदासाठी काँग्रेसचे गटनेते गणेश राऊत व राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी नामनिर्देशन दाखल केले. सभापती पदांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. सभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने पीठासीन अधिका-यांनी निवड झालेल्या सदस्यांची नावे जाहीर केली.स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, नियोजन व विकास समितीचे सभापतीपदी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांची निवड झाली. सा. बां. समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या खान रुबिना खातम अमजद, पाणीपुरवठा सभापतीपदी पूनम भगत, स्वच्छता सभापतीपदी राष्ट्रवादीच्या शबनमबी कमलखान, शिक्षण सभापतीपदी काँग्रेसच्या लक्ष्मीबाई जगदाळे, महिला व बालकल्याण समितीपदी संगीता पाचगे यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या संगीता पाचगे यांची निवड झाली. स्थायी समिती सदस्य म्हणून भाजपाचे भास्कर दानवे, शिवसेनेचे रावसाहेब राऊत, काँग्रेसचे अरुण मगरे यांची निवड झाली.
जालना पालिकेच्या विषय समित्यांवर महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:21 AM