नितेश बनसोडे श्रीक्षेत्र माहूर (जि. जालना) : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर दर्शनासाठी लवकरच रोप-वेवरून जाण्याचा योग येणार आहे. प्रस्तावित रोपवेचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी श्री रेणुकादेवीच्या विश्वस्तांना नागपूर येथे दिली़माहूर तीर्थक्षेत्राच्या विविध मागण्या तसेच प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत, यासाठी श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, आशिष जोशी यांच्यासह शिष्टमंडळाने गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली़ माहूर तीर्थक्षेत्र विकासाचा सुधारित २१६ कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे़ त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे़ पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत़पहिल्या टप्प्यातील ६८ कोटींपैकी आजवर केवळ २ कोटी निधी प्राप्त झाला आहे़ सर्व अंदाजपत्रक मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आले आहेत़ अंदाजपत्रकास मंजुरी देवून तत्काळ निधी द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली़ तसेच भाविकांचा वाढता ओघ पाहता रोपवेचे कामही तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी करण्यात आली़मुख्य दर्शनद्वारही होणार मोठेभाविकांना श्री रेणुकादेवीचे दर्शन चांगल्या प्रकारे घेण्यासाठी देवीच्या गाभाºयाचे मुख्य दर्शनद्वार मोठे करण्याची आवश्यकता आहे़ पुरातत्त्व विभागाने त्यांच्या यंत्रणेमार्फत काम करण्यात येईल व अंदाजपत्रकाप्रमाणे १ कोटी २७ लाख रुपये संस्थानने पुरातत्त्व विभागाकडे वर्ग करावेत, असे कळविले होते़ दर्शनद्वारासाठी सांस्कृतिक मंत्रालय १ कोटी २७ लाख रुपये लवकरच पर्यटन मंत्रालयाकडे वर्ग करणार आहे, अशी माहिती विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी दिली़
माहूरच्या रोप-वेचा प्रश्न महिनाभरात मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 5:30 AM