शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

MPSCपासचा बोभाटा; सत्कारही स्वीकारले, लग्नाला स्थळ आले अन् झाला भांडाफोड, गुन्हा दाखल

By दिपक ढोले  | Published: August 05, 2022 5:42 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दखल घेऊन त्याला नोटीस बजावली होती.

जालना : एमपीएससीने प्रसिध्द केलेल्या यादीमध्ये खाडाखोड करून खोटे पत्र तयार करून विक्रीकर उपायुक्त झाल्याचा गावभर बोभाटा करणे तरुणाच्या अंगलट आले आहे. या तरुणावर आज सेवा कर भवनाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर पंढरीनाथ लोखंडे (रा. कोदोली ता. भोकरदन) असे संशयिताचे नाव आहे.

कोदोली येथील तरुण रामेश्वर लोखंडे हा भोकरदन येथे एका दुकानात आधार कार्ड लिंक व विविध अर्ज ऑनलाइन भरण्याचे काम करतो. घरची परिस्थिती हलाक्याची असल्याने चांगली नोकरी मिळवून अधिकारी होण्याची त्याची इच्छा होती. मात्र, अनेकवेळा परीक्षा देऊन यश मिळाले नाही. त्यामुळे त्याने काही मित्रांच्या मदतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे खोटे पत्र तयार केले. त्यानंतर एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन विक्रीकर उपआयुक्त झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली. 

कोदोली येथील ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला. सत्कार करण्यासाठी अनेकांनी घरासमोर गर्दी केली होती. त्याला लग्नासाठी स्थळही आले होते. परंतु, त्याच्या बोगस विक्रीकर उपायुक्ताचा भांडाफोड झाला. अन् महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दखल घेऊन त्याला नोटीस बजावली होती. शुक्रवारी जालना येथील सेवा कर भवनातील राज्यकर निरीक्षक गणेश संगम यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात संशयित रामेश्वर लोखंडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी केली फसवणूकराज्यकर आयुक्तालयाच्या वतीने राज्य उपायुक्तांची यादी प्रसिध्द करण्यात आली होती. या यादीमध्ये सुजित रमाकांत शिंदे यांचे नाव व नियुक्तीचे ठिकाण खोडून त्या ठिकाणी रामेश्वर लोखंडे असे नाव टाकले होते. त्यात राज्यकर उपआयुक्त ऐवजी राज्यकर उप आयुक्त मुंबई असे ठिकाणी टाकून अधिकारी झाल्याचा बोभाटा केला होता.

अहमदनगर जिल्ह्यातही प्रकार उघडकीसअहमदनगर जिल्ह्यातील तरुणीनेही उपजिल्हाधिकारी झाल्याचे खोटे पत्र तयार करून सत्कार सोहळे करून घेतले. वैष्णवी अर्जुन गिरी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने अशाच प्रकारे खोटी कागदपत्रे तयार करत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या तरुणीने उपजिल्हाधिकारी झाल्याचे सांगत एमपीएससीच्या सही आणि शिक्क्याचे खोटे पत्र तयार केले. या पत्रात तिची निवड स्पोर्ट कोट्यातून झाल्याचा उल्लेखही आहे. या दोन्ही फसवणुकीच्या घटना फेब्रुवारीमध्ये उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोघांवरही कारवाई केली जाईल असे जाहीर केले होते.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी