शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

'पाटील मामा पाणी घ्या!' मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने चिमुकलीची विनवणी

By विजय मुंडे  | Published: February 13, 2024 6:34 PM

प्रकृती खालावली असली तरी जरांगे यांनी उपचार, पाणी घेण्यास नकार दिला आहे

वडीगोद्री (जि.जालना) : उपोषणाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजीही जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला. जरांगे यांनी किमान पाणी तरी प्यावे, यासाठी महिलांसह ग्रामस्थांनीही विनावणी केली. परंतु, जरांगे यांनी त्यांना नकार दिला. विशेष म्हणजे उपोषण स्थळाशेजारी राहणारी दीड वर्षीय काव्य या मुलीनेही एक तास जरांगे पाटील यांच्या जवळ बसून पाटील मामा, पाणी घ्या, अशी विनवणी केली. काव्या जरांगे पाटील यांच्या डोक्यावरून हात फिरवत पाणी पिण्याची विनवणी करीत असताना महिलाही भावूक झाल्या होत्या.

सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मंगळवारी जिल्हास्तरावरील वैद्यकीय पथक अंतरवाली सराटी गावातील उपोषणस्थळी आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी आरोग्य तपासणी करू देण्याची विनंती केली. परंतु, जरांगे पाटील यांनी तपासणी करण्यास नकार दिला. आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी किमान पाणी प्यावे, यासाठी महिला, ग्रामस्थांनीही विनवणी केली. परंतु, त्यांनाही जरांगे पाटील यांनी नकार दिला.

विभागीय अयुक्तांनी साधला संवादविभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून पाणी व उपचाार घेण्याची विनंती केली. यावेळी मनोज जरांगे यांनी नकार दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर उपस्थित होते.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना