परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींचे प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षणपद गुरुवारी जाहीर झाले. यात निवडणुकीत चुरस निर्माण करणाऱ्या अनेक पॅनल प्रमुखांनाच सरपंचपदापासून दूर रहावे लागणार आहे. त्यामुळे कही खुशी-कही गम अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यात पहिल्या टप्प्यातील पार पडलेल्या ३८ ग्रामपंचायतीचे आरक्षण गुरुवारी तहसील कार्यालयात तहसीलदार रूपा चित्रक यांनी जाहीर करण्यात आले आहे. यात वाटूर ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग, श्रीधर जवळा सर्वसाधारण, सातोना (खु) ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाली आहे. सातोना (बु.) सर्वसाधारण, शेलगाव नामाप्र, डोल्हारा सर्वसाधारण, वैजोडा नामाप्र, मसला अनुसूचित जमाती, शिंगोना सर्वसाधारण, लिखीत पींप्री सर्वसाधारण, आकोली सर्वसाधारण, अंबा सर्वसाधारण, बाबई सर्वसाधारण, नांद्रा सर्वसाधारण, काऱ्हाळा अनुसूचित जाजी, सावरगाव (बु.) नामाप्र, सावंगी गंगा किनारा नामाप्र, पाटोदा माव ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे. ब्राम्हणवाडी सर्वसाधारण, हातडी सर्वसाधारण, पांडेपोखरी सर्वसाधारण, सुरूमगाव सर्वसाधारण, अंगलगाव सर्वसाधारण, लिंगसा अनुसूचित जाती, रायपूर सर्वसाधारण, सातारा वाहेगाव नामाप्र, सोंयजना सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. हनवडी सर्वसाधारण, मावपाटोदा सर्वसाधारण, परतवाडी सर्वसाधारण, वलखेड नमाप्र, सिरसगाव सर्वसाधारण, बाणाचीवाडी नामाप्र, पिंपळी धामणगाव सर्वसाधारण, वाहेगाव सातारा नामाप्र, आसानगाव नामाप्र, संकनपुरी नामाप्र, कोकाटे हादगाव सर्वसाधारण याप्रमाणे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार रूपा चित्रक, नायब तहसीलदार मंगल मोरे, व्ही. एस. दंडेवाड, विद्यासागा ससाणे आदींची उपस्थिती होती.
कॅप्शन : परतूर तहसील कार्यालयात आरक्षण जाहीर करताना तहसीलदार रूपा चित्रक व इतर.