शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मराठा आरक्षणासाठी जालन्यात बेमुदत उपोषण; ४ आंदोलकांची प्रकृती खालावली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 7:35 PM

उपोषणातील एकाही व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास सरकारला याची किंमत मोजावीच लागेल, आंदोलकांचा इशारा

- श्याम पाटीलसुखापुरी (जि. जालना): मराठा आरक्षणासाठी रविवारी अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावात गावकऱ्यांनी रविवारी बेमुदत उपाेषणास सुरुवात केली. या उपोषणात २१ महिला व पुरुषांचा समावेश असून, यात तीन वयोवृद्धांचाही सहभाग आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दोन युवकांसह दोन वयोवृद्ध महिलांची प्रकृती खालावली. त्यांना उपोषणस्थळीच उपचार देण्यात येत आहेत.

वडीकाळ्या गावात होत असलेल्या उपोषण थांबवावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातील नेत्यांसोबत दोन दिवसांपूर्वी व्यापक बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर उपोषणापूर्वी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासित करण्यात आले होते. त्यानुसार शासनाचे एक शिष्टमंडळ औरंगाबाद येथे दाखल झाले; परंतु त्यांच्याकडे झालेल्या निर्णयाबाबत माहिती देण्यात न आल्याने ते वडीकाळ्या गावात येऊ शकले नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. 

दरम्यान, या उपोषणात सहभागी झालेल्या शरद दिलीप रक्ताटे या युवकाची तब्येत सोमवारी सायंकाळी अचानक खालावली. यावेळी आरोग्य पथक उपोषणस्थळी हजर नसल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली. संभाजी गव्हाणे, राहीबाई पवार, विमलबाई काळे या उपोषणकर्त्यांनादेखील उपचारांची गरज आहे. सध्या ग्रामस्थांमध्ये सरकारच्या विरोधात रोष तयार होऊ लागला आहे. उपोषणस्थळी सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप, दीपक लंके, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यासह दहा पोलिस कर्मचारी तैनात आहेत. 

अन्यथा आंदोलक रस्त्यावर येणारउपोषणातील एकाही व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास सरकारला याची किंमत मोजावीच लागेल. झालेल्या चर्चेनुसार सरकारने तातडीने मागण्या मंजूर कराव्या. उपोषणकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून सरकारने काळजी घ्यावी, नसता सकल मराठा समाज रस्त्यावर उतरेल. - मनोज जरांगे, मराठा आंदोलक

शिष्टमंडळ औरंगाबादमध्ये दाखलमुख्यमंत्र्यांसोबत शनिवारी झालेल्या चर्चेनुसार सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेणार होते व सोमवारी हे शिष्टमंडळ वडीकाळ्या गावात येऊन त्याची माहिती देणारे होते. यात मंत्री दादा भुसे, संदीपान भुमरे यांच्यासह प्रधान सचिवांचा यांचा समावेश असणार आहे. हे शिष्टमंडळ औरंगाबाद येथे दाखल झाले आहे; परंतु निर्णयाबाबत सरकारकडून त्यांना कोणतेही पत्र न आल्याने ते औरंगाबादमध्ये थांबले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना