शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, 24 डिसेंबरपर्यंत..; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 7:34 PM

'सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांशी दगाफकटा करू नये.'

Manoj Jarange Jalna Sabha : आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, आम्ही दंड आणि मांड्या थोपटल्या आहेत, आता तुम्हाला सुट्टी नाही. आरक्षण दिले नाही तर गाठ मराठ्यांशी आहे, असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांची जालन्यात विराट सभा पार पडली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा देण्यासोबतच छगन भुजबळांवरही जोरदार हल्लाबोल केला. 

...तर गाठ मराठ्यांशी आहे राज्य सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांशी दगाफकटा केला तर सुट्टी देणार नाही. 70 वर्षांपासून आमच्यावर अन्याय होतोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना 24 डिसेंबरपर्यंची वेळ आहे, 24 तारखेला सरसकट आरक्षण मिळाले नाही, तर गाठ मराठ्यांशी आहे, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी सरकारला दिला. 

ओबीसी आरक्षणाचा एका जातीला फायदाजरांगे पुढे म्हणतात, ओबीसी आरक्षणाचा फक्त एका जातीला फायदा झाला आहे. 2000 ते 2014 या काळात या व्यक्तीने 80 टक्के हिस्सा एकट्याने खाल्ला, इतर 300 जातींना 20 टक्के हिस्सा मिळाला. याला फक्त सभेला धनगर समाज लागतो. आम्ही त्यांना म्हटलं की, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका जाहीर करा, ते करत नाही. 

भुजबळांवर जहरी टीकाहे सगळ्यात वाया गेलेले मंत्री आहेत. यांच्या सांगण्यावरुनच आमच्या लोकांना अटक केली. हिंगोलीत येऊन गप्पा हाणतो. इकडे येतो आणि जातीवाद करतो. घटनेच्या पदावर बसतो, सरकारसोबत राहतो आणि महापुरुषांच्या जाती काढतो. भारतातला सर्वात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ आहे. जाती-जातीत तेढ निर्माण करणारा, ओबीसी बांधव आणि मराठा बांधवांमध्ये दंगली घडवण्याचे काम करणारा, सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ, अशी घणाघाती टीकाही जरांगेंनी यावेळी केली.

दोन दिवसात गुन्हे मागे घ्यालाठीचार्जवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आमच्या आया बहिणींवर हल्ला झाला. इतके निष्ठूर सरकार आम्ही कधीच पाहिले नाही. एकीकडे म्हणता की आमच्यावरील गुन्हे मागे घेणार, दुसरीकडे आमच्या लोकांना अटक करता. तीन महिन्यानंतर आमच्या लोकांना अटक केली. सरकारला एक शेवटची विनंती आहे, 2 तारखेला उद्या एक महिना पूर्ण होतोय. दोन दिवसांत अंतरवलीतले गुन्हा आणि एक महिन्यात महाराष्ट्रातील मागे घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळJalanaजालना