शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मराठा आरक्षण आंदोलन : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 12:51 AM

मराठा आंदोलनामुळे रद्द झालेल्या मेगा भरतीमुळे अनेकांचे नुकसान झाले असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केल्याबद्दल जालना शहरासह जिल्ह्यात याचे संतप्त पडसाद उमटले. संतप्त मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलनस्थळी प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा आंदोलनामुळे रद्द झालेल्या मेगा भरतीमुळे अनेकांचे नुकसान झाले असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केल्याबद्दल जालना शहरासह जिल्ह्यात याचे संतप्त पडसाद उमटले. संतप्त मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलनस्थळी प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त केला.आंदोलनात कोणीही राजकारण करू नये असा इशारा ही यावेळी दिला. तथापी मुख्यमंत्र्यांनी आंदोलन स्थगित करण्यासाठी तहसीलदारांमार्फत पाठविलेले पत्र फाडून फेकत चर्चा नाही तर क्रांतीदिनी चक्काजामसह आंदोलन होईलच, असा निर्धार मराठा बांधवांनी व्यक्त केला.संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास सातव्या दिवशी मंगळवारी उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी ४०० जणांनी मुंडण केले. सलग तीन दिवसात ११०० समाज बांधवांनी मुंडण करून शासनाचा निषेध नोंदविला.गुरूवारी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनातही विविध ठिकाणी मुंडण आंदोलन सुरू राहणार आहे. मंगळवारी आंदोलनस्थळी मान्यवरांसह विविध घटकांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे पत्र जिल्हा प्रशासनातर्फे तहसीलदार बिपीन पाटील यांनी आंदोलनस्थळी आणले. या पत्राचा आंदोलनातील समाज बांधवांनी मुद्देनिहाय खरपूस समाचार घेऊन ते फाडून फेकले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.हसनाबाद : पिंपळगाव कोलते येथील नागरिकांनी मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी आज सकाळी राजूर ते फुलंब्री रोड वर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. भोकरदन येथून तहसील कार्यालयाचे आलेले प्रतिनिधी सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, आंदोलना दरम्यान मराठा तरूणावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत असे नमूद करण्यात आले होते. राजूर, हसनाबाद, दाभाड, फुलंब्री, सिल्लोड औरंगाबादकडे जाणारी वाहतूक दोन तास खोळंबली होती. हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे, उपनिरीक्षक गुलाब पठाण यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात होता.जाफराबाद : जाफराबाद तालुका धनगर आरक्षण समन्वय समितीतर्फे मंगळवारी आयोजित चक्का जाम आंदोलनात हजारो धनगर समाज बांधवांनी शेळ्या मेंढ्यासह सहभाग घेऊन धनगर समाजाला अनुसूचित प्रवर्गात सामावून घेऊन या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच जामखेड येथील डॉ.इंद्रकुमार भिसे आणि सहकाºयांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे इ. मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.चक्का जाम आंदोलनास अहिल्यादेवी होळकर चौक येथून सुरवात होऊन तहसील कार्यालय परिसरात एकत्र येत हे आंदोलन तब्बल पाच तास करण्यात आले. याचा मोठा फटका शहरातील वाहतुकीस बसला होता.आंदोलकांनी महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करत गेल्या चार वर्षात मंत्रिमंडळाच्या १५० कॅबिनेट बैठका होऊनही धनगर समाजाला दिलेले आश्वासन पाळले नाही. शासनाने समाजाची फसवणूक केली आणि त्यातून समाजात उद्रेकाची भावना निर्माण झाली असे म्हणत आरक्षण लागू करा अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.या वेळी सुरेश दिवटे, विठ्ठल राधवन, दीपक बोराडे, दामोदर वैद्य, कैलास दिवटे, प्रकाश दिवटे, श्याम वैद्य, लक्ष्मण शेवाळे, राम गुरव, दत्ता सोनसळे, सचिन मुकूटराव, सचिन खांडेकर, सचिन देशमुख, कृष्णा जोशी, निवृत्ती दिवटे, प्रवीण सोरमारे, संतोष कोल्हे, साहेबराव खंबाट, शोभा मतकर, निवृत्ती दिवटे, सुदाम रोडगे, यांच्यासह समाज बांधवाची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन