शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
3
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
4
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
5
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
6
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
7
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
8
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
9
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
10
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
11
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
12
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
13
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
14
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
15
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
16
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
17
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
18
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
19
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
20
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'

शासनाला 2 महिन्यांचा वेळ, दगाफटका झाल्यास आर्थिक नाड्या आवळणार; जरांगे पाटलांचा इशारा

By विजय मुंडे  | Published: November 02, 2023 8:28 PM

साखळी उपोषण सुरूच राहणार, आत्महत्या करू नका

- विजय मुंडे

जालना / वडीगोद्री : मराठवाड्याचे आज भागले असते, परंतु सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ही लढाई सुरू आहे. ही मोठी लढाई आहे आणि जिंकायची आहे. आरक्षण कायद्यात टिकले पाहिजे. यासाठी शासनाला दोन महिन्यांचा वेळ देवू. आता दगाफटका झाला तर यांच्या सर्व नाड्या आवळण्यासाठी मुंबईच्या बाहेर कोट्यवधी मराठे बसतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या नवव्या दिवशी बुधवारी निवृत्त न्यायमूर्तींसह शासनाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.

मराठवाड्यात १३ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्या नोंदीच्या आधारे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होते. परंतु, आम्हाला ते मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी समिती राज्यभरात काम करावे, मराठवाडा आणि राज्याचा डाटा मिळून समितीने दोन महिन्यात अहवाल द्यायचा आणि त्याच्याआधारे सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी. सख्या परिवारातील लोकांना, सख्खे रक्ताचे नातेावाईक, रक्ताचे सर्व सोयरे आणि राज्यातील मागेल त्या गरजवंत मराठ्यांना त्याच अहवालाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे. अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

राज्य मगासवर्ग आयोग, शिंदे समिती, सल्लागार समितीला कम करायचे आहे. मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिने देवू. दोन महिन्यात दगाफटका झाला तर मुंबईच्या नाड्या बंद करू. यांना घराच्याबाहेर पडता आले नाही पाहिजे, असे तीव्र आंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला.यांनी केली जरांगे पाटील यांच्याशी चर्चा

मंत्री उदय सामंत, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री संदीपान भुमरे, आ. बच्चू कडू, नारायण कुचे, मंगेश चिवटे, निवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड, निवृत्त न्यायाधीश सुनील सुक्रे, जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी यशस्वी चर्चा केली.

बच्चू कडू यांची शिष्टाई आली कामीमाजी मंत्री आ. बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी मंगळवारी रात्री चर्चा केली होती. त्यानंतर आज निवृत्त न्यायमूर्ती व शासनाचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे आले. सोबत आ. बच्चू कडू हे ही होते. या आंदोलनादरम्यान आ.कडू यांनी केलेली शिष्टाई कामी आली आणि जरांगे पाटील व मराठा समाजाने शासनाला दोन महिन्यांचा वेळ दिला.

साखळी उपोषण सुरूच राहणार, आत्महत्या करू नकाआजपासून आमरण उपोषण बंद करा. साखळी उपोषण सुरू ठेवा. उग्र आंदोलन करू नका. कोणीही आत्महत्या करू नका. पुढील लढाईची तयारी माझ्यासोबत करा. पुढे मोठा लढा लढायचा आहे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.महाराष्ट्रातील गुन्हे मागे घ्या

महाराष्ट्रात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. अंतरवालीतील गुन्हे १५ दिवसांत मागे घेणार आणि उर्वरित गुन्हे एका महिन्यात मागे घेणार असा शब्द शिष्टमंडळाने दिल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना