शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
4
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
6
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
7
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
8
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
9
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
10
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
11
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
12
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
13
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
14
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
15
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
16
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
17
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
18
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
19
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
20
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले

मराठ्यांना वेगळे आरक्षण नकोच, ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 12:21 PM

सग्या -सोयऱ्यांची अंमलबजावणी करून ओबीसीतून आरक्षण कधी देणार हे सांगा ?

जालनामराठा समाजास शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यात वेगळे १० टक्के आरक्षण देण्याच्या मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीस राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. मात्र, वेगळे आरक्षण आम्हाला नकोच. हक्काचे ओबोसी आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. सग्या -सोयऱ्यांची अंमलबजावणी करून ओबीसीतून आरक्षण कधी देणार हे सांगा ? असा सवाल जरांगे यांनी सरकारला केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावलं आहे. तत्पूर्वी राज्यातील मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार, राज्यात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.  यावर जरांगे यांनी आक्षेप घेतला आहे. जरांगे म्हणाले, सरकार देत आहे ते आरक्षण आम्ही मागितले नाही. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. ज्यांचा सातबारा नाही त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी आवश्यक आहे. हे होत नसेल तर सरकारने अधिवेशन कशासाठी बोलावले आहे. सरकारने वेगळे १० टक्के आरक्षण देऊन आमची फसवणूक केली आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. आम्ही सरकारला भरपूर वेळ दिला आहे. आता लढल्याशिवाय न्याय नाही मिळणार. सगेसोयरे याची अंमलबजावणी कशी होत नाही हे पाहतोच, असा इशारा देखील जरांगे यांनी यावेळी दिला. 

उद्या आंदोलनाची दिशा ठरणार अधिवेशनात सगे-सोयरे यावर चर्चा होते का ते पाहणार आहोत. सायंकाळपर्यंत आम्ही वाट पाहणार असून सकारात्मक काही घडले नाही तर उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार, अशी माहिती जरांगे यांनी दिली आहे.

काय आहे आयोगाच्या अहवालात मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागास असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचेही अहवालात म्हटले आहे. मराठा समाज हा राज्यभरात २८ टक्के असल्याचे न्या. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आढळून आले. सुमारे ५२ टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट  आधीच राखीव प्रवर्गात आहे. त्यामुळे राज्यातील २८ टक्के असलेल्या अशा मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य ठरेल, असे आयोगाच्या अहवालात असल्याच्या माहिती आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाState Governmentराज्य सरकार