लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : औरंगबादकड़ून नांदेड़कड़े जाणारी मराठवाड़ा एक्सप्रेसच्या इंजिनमधे अचानक बिघाड झाल्याने परतूर रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री दोन तास थांबवण्यात आली होती. यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ झाली.मराठवाड़ा एक्स्प्रेस परतुर स्थानकात रात्री आठ वाजेच्या दरम्यान स्थानकात आली, असता, या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने यांच् स्थानकात थांबवण्यात आली, यानंतर स्टेशन मास्तर विनय कुमार यांनी कोड़ी रेल्वे स्थानकात उभे असलेले इंजिन बोलावले, खराब झालेले इंजिन काढून नवीन इंजिन जोडण्यात आले. त्यामुळे दोन तासानंतर ही रेल्वे पुन्हा पुढील प्रवासाकडे रवाना झाल्याची माहिती स्टेशनमास्तर विनयकुमार यांनी दिली. इंजिनमध्ये नेमका कुठला तांत्रिक बिघाड झाला होता, याचा तपशील कळू शकला नाही, हे इंजिन दुरूस्तीसाठी बुधवारी तंत्रज्ञ येणार आहेत.प्रवासी काकीनाडाने गेलेयाच दरम्यान रात्री दहा वाजेच्या सुमारास काकीनाडा एक्सप्रेस ही परभणीकड़े जाणारी ही रेल्वे आली, अडकून पडलेले बरेच प्रवासी या गाडीने रवाना झाले. गाडीचे इंजिन अचानक फेल झाल्याने प्रवासी ३ तास अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, रात्री ११ वाजता ही गाडी धर्माबादकडे रवाना झाली.
मराठवाडा एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 1:08 AM