चौकट
डिस्काऊंट देऊनही विक्री अत्यल्पच
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला कोरोनाचा उद्रेक आणि बाजारपेठ कधी सुरू तर कधी बंद यामुळे इलेक्ट्रॉनिक्स बाजार संकटात सापडला आहे. सध्या उन्हाचा पारा ४० अंशावर गेल्याने कुलरसह एसीला मोठी मागणी आहे. त्याचा मोठा साठाही आम्ही भरून ठेवला आहे. परंतु बाजार बंदचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. हे संकट कधी संपेल यावरच आमचे भविष्य अवलंबून आहे.
वासुदेव देवडे, इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे व्यापारी
-------------------------------------------------------
चौकट
ट्रॅक्टरची मागणी जास्त पुरवठा कमी
आज शेतीचे आधुनिकीकरण झाले आहे. त्यामुळे ट्रॅक्टर आणि शेती हे समीकरण बनले आहे. त्यामुळे ट्रॅक्टरला मोठी मागणी असून, गेल्या चार महिन्यात दहा ते पंधरा हजार रूपयांची वाढ किमतीत झाली आहे. ४५ ते ५० हॉर्स पॉवर्सला मोठी मागणी आहे. परंतु ज्या तुलनेने मागणी आहे, त्या तुलनेने कंपनीकडून लॉकडाऊनमुळे दिलेली ऑर्डर पूर्ण करतांना अडचण येत आहे. ही समस्या लवकरच दूर होईल अशी आशा आहे.
अंबरीश लाहोटी, ट्रॅक्टर विक्रेते
------------------------------------------------------
रिअल इस्टेटला अच्छे दिन
सध्या रिअल इस्टेटला चांगले दिवस आले आहेत. सध्या तयार घरांना मोठी मागणी वाढली आहे. असे असतांना शासनाकडूनही मुद्रांक शुल्कात सूट तसेच महिलांच्या नावे घर खरेदी केल्यावर देण्यात येणारी सुविधा यामुळे घरांसह फ्लॅटला मागणी आहे. घरांच्या किमती या सिमेंट आणि स्टीलमुळे वाढल्या आहेत. हे दर कमी झाल्यास घर घेण्याचे नागरिकांचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होऊ शकते.
अभय कुलकर्णी, बांधकाम व्यावसायिक
------------------------------------------------
चौकट
सोन्याचे दर वाढले
मध्यंतरी लग्नसराई नसणे तसेच कोरोनामुळे सोन्याची मागणी घटल्याने सोने हे प्रति तोळा ५५ हजार रूपयांवरून ४८ हजार रूपयांवर खाली आले होते. परंतु आता पुन्हा विवाह मुहूर्त असल्याने सोन्याच्या दरात एक ते दीड हजार रूपयांची वाढ झाली आहे. ही वाढ अशीच कायम राहील अशी आशा आहे. पाडव्याला मुहूर्त साधण्यासाठी अनेकजण थोडे का होईना सोने-चांदीची खरेदी करतात. त्यामुळे लॉकडाऊन हटल्यासच हे शक्य होणार आहे.
भरत गादिया, सराफा व्यापारी