लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर हे उद्योग आणि व्यापाऱ्यांचे मोठे केंद्र राहिले आहे. या समाजाने दाखविलेल्या दातृत्वामुळे जालना शहराचा विकास झाला असून, विविध उद्योगाच्या माध्यमातून देश आणि जगाच्या नकाशावर पोहोचले असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.मारवाडी युवामंचच्या वतीने नुकताच मारवाडी समाजातील प्रतिष्ठांना समाजभुषण, जालनारत्न आदी पुरस्काराने गौरविले. या सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना खोतकर यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून विशेष सत्कार केला. यामध्ये जालना भूषण घनश्याम गोयल, समाजरत्न पुरस्कारप्राप्त बंकट खंडेलवाल, अर्जुन गेही, शैलेश देविदान, अर्चना तोतला, नंदलाल राठी, डॉ. मंगल शुक्ला, श्रीकिशन डागा, पंकज खिवसरा, सिद्धांत तवरावाला, आचार्य व्यास, रमेशचंद सोनी, धरमचंद रूणवाल, दामोदर बजाज, प्रा. जवाहर काबरा, जय भगवान जिंदल, विष्णूकांता भक्कड, डॉ. अनुप कासलीवाल, सुनील अग्रवाल, सुनील राठी, श्याम लखोटिया, नितीन तोतला यांचा यावेळी उपस्थिती होती.यावेळी उद्योगपती किशोर अग्रवाल, संजय खोतकर, वीरेंद्र धोका, अभिमन्यू खोतकर, ब्रिजमोहन लड्डा, सुभाष देविदान, सुदेश करवा, रमेश अग्रवाल, उमेश पांचारिया, महेश भक्कड, पवन जोशी, चेतन बोथरा, महावीर जागीड आणि दिनेश बरलोटा, मनिष तवरावाला उपस्थित होते.
शहराच्या विकासात मारवाडी समाजाचे मोठे योगदान : खोतकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:17 AM