शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मत्स्योदरीची ‘टीम व्हेलर’ एआयआरसीमध्ये अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:30 AM

रेसिंग कारच्या तोडीस तोड अशी फॉमु$र्ला वन रेसिंग कार मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ‘टीम व्हेलर’ने तयार केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : देखणे डिझाईन, दोन स्पार्क प्लग असलेले १२५ सीसीचे इंजिन आणि तासाला ८० किलोमीटर्सचा वेग असे फीचर्स असलेली रेसिंग कार सध्या युवकांचे आकर्षण ठरले आहे. एखाद्या नामांकित कंपनीच्या रेसिंग कारच्या तोडीस तोड अशी फॉमु$र्ला वन रेसिंग कार मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञानमहाविद्यालयाच्या ‘टीम व्हेलर’ने तयार केली आहे. या कारने नुकत्याच पुणे येथे झालेल्या एआयआरसी या राष्ट्रीय स्पर्धेत अकरावा क्रमांक पटकावला आहे.विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी अगोदर या कारचे डिझाईन तयार केले. त्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक स्पेअर पार्टची निर्मिती केली. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षणासाठी व अनुभवासाठी अशा प्रकारच्या विविध नाविन्यपूर्ण यंत्रांची निर्मिती करावी लागते. याचाच एक भाग म्हणून मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी रेसिंग कार (गो-कार्ट) तयार करण्याचे ध्येय समोर ठेवले होते. सलग तीन महिने अथक परिश्रम घेऊन व स्पर्धेच्या सर्व अटींची पूर्तता करून ही अनोखी रेसिंग कार साकारली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे, सचिव मनीषा टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. के. बिरादार आदींनी कौतुक केले.६० संघांतून ११ क्रमांकपुणे येथील डी. वाय. पाटील अभियंत्रिकी महाविद्यालयात झालेल्या आॅटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशिप (ए. आय. आर. सी) या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये या कारने ६० संघामधून अकरावा क्रमांक पटकावला.संघप्रमुख चेतन जोशी, उपप्रमुख अभिषेक जोहरे, गाडीचालक राजेश अग्रवाल, काकासाहेब कान्हेरे, विजय पवार, सुनील लहाने, अभिषेक शर्मा, विकी तोडावत, कृष्णा कान्हेरे, सुदर्शन जाधव, धीरज भंडे, कृष्णा झिरमिरे, मोहसीन पठाण, कांचन कुलकर्णी, प्रणाली इंगळे, प्रीती गरकळ, नीलेश ठोंबरे, कृष्णा धांडे, वैभव गायकवाड, सचिन चव्हाण तसेच प्राध्यापक मार्गदर्शक प्रा. प्रफुल्ल ठाकरे आदींनी ही गाडी साकारली आहे.

टॅग्स :bikeबाईकtechnologyतंत्रज्ञानcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीscienceविज्ञान