लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारने मराठा समाजाला एसईबीसी या प्रवर्गा अंतर्गत आरक्षण लागू केले आहे. असे असताना वैद्यकीय प्रवेशाबाबत मात्र, या आरक्षणाचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ होत नाही. यामुळे राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढावा, अशा आशयाची मागणी करण्यात आली आहे.जालना येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने वैद्यकीय प्रवेशासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय अध्यादेश काढून दूर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. एकूणच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरात ५८ मोर्च शांततेने काढण्यात आले. या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत १० टक्के आरक्षण लागू केले. तसा निर्णयही दोन्ही सभागृहात सर्वसंमतीने घेण्यात आला होता.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या अंतर्गत वैद्यकीय प्रवेश मिळू शकत नाही, असा निर्णय दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. या शिष्टमंडळामध्ये जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख, संतोष गाजरे, दत्तात्रय शिंदे, अशोक पडूळ, रमेश गजर, अविनाश कव्हळे, शुभम टेकाळे, प्रशांत म्हस्के, नरसिंग पवार, आकाश ढेंगळे, मिलींद वाघमारे, संदीप ताडगे, अनिल मदन, राम कुहिरे, दिलीप तळेकर, संतोष कºहाळे, नीलेश गोर्डे, किरण जाधव, अमोल सुळसुळे, विष्णू शिंदे, अर्जुन गोरे, शिवाजी सोळंके, कृष्णा गाडेकर, गणेश मगर, राजेश्वर जिगे, राधाकिशन कदम, खुशाल लोंढे, सुभाष कोळकर, एस.टी. देशमुख, रणजित भांदरगे, संजय बोबडे, राजेश कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश होता.
वैद्यकीय प्रवेश; अध्यादेशाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 1:20 AM