या किंमती अडीच हजार रूपयांवरून थेट सहा हजार रूपयांवर पोहचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. ही बाब लक्षात घेऊन लवकरच हे १४ डोस लागणाऱ्या इंजेक्शनचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केला जाणार असल्याची घोषणा टोपे यांनी यावेळी केली. तसेच लसीकरण वाढविण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगून मिळेल तेथून लस खरेदी करणार असल्याचेही ते म्हणाले.
रूग्णालयांच्या बिलांची तपासणीसाठी कर्मचारी नेमणार
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्या बैठकीत अनेक खासगी रूग्णालय हे रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून अधिकचे शुल्क आणि बिल आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याामुळे आता दरररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत सरकारी कर्मचारी कोविड सेंटरवर तैनात करण्यात येणार आहे. ज्यामुळे त्यांनी बिलावर स्वाक्षरी केल्यावरच ते बिल रूग्णालयात भरावे लागणार आहे. जालन्या प्रमाणेच अन्य जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याची नाेंद घेऊन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश टोपे यांनी दिले.