लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यातील भराडखेडा येथे विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंग कदम यांनी भेट देऊन विविध कामांची पाहणी केली.भराडखेडा येथे सोयाबीन पिकाची पीक कापणी प्रयोग सुरू आहे. या कामाची पाहणी व सर्वेक्षण कृषी सहसंचालकांनी करून येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला़ यानंतर मग्रारोहयोअंतर्गत झालेले शेततळे, शेडनेट आदींची पाहणी केली.पिकांचे उत्पादन, निगा, परागीकरणाची पध्दत अशा विविध बाबींवर शेतकऱ्यांकडून माहिती घेतली़यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक शिंदे, तालुका कृषी अधिकारी ठक्के यांनी या भागात कृषी विभागाकडून राबविण्यात येणाºया विविध योजना व त्यामध्ये शेतक-यांचा असलेला सहभाग, उत्पन्न, लाभ, निवड याविषयी सहसंचालकांना माहिती दिली़याप्रसंगी ग्रामस्थांनी शेततळ््यांना प्लास्टिकचे अस्तरीकरणाची मागणी केली. यावर सहसंचालकांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले़ सहसंचालक कदम यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी शेतक-यांना पिकांवर पडलेल्या रांगाबद्दल माहिती दिली.यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक शिंदे, तालुका कृषी अधिकारी ठक्के, कृषी सहायक इंदलकर, हिवराळे, झुंजारे, घडे आदींची उपस्थिती होती.
कृषी सहसंचालक प्रतापसिंग कदम यांच्या विविध कामांना भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 12:51 AM