लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना शासनाकडून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडे परत गेला आहे. हा निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गेली. एकीकडे सदस्य कामासाठी निधी मागतात तेव्हा प्रशासन निधी द्याला तयार नसते. आता कोट्यवधी रुपये परत गेले आहे. याचे काय, असा सवाल सदस्यांनी उपस्थित करत सभेत गोंधळ केला.बुधवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, सभापती तौर, सभापती बनसोडे, सभापती घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, वित्त अधिकारी चव्हाण यांच्यासह सर्व सदस्य व अधिका-यांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीलाच सदस्यांनी प्रोसेडींग न मिळाल्याच्या मुद्यांवरुन अधिकाºयांना धारे धरले. सदस्य गणेश फुके यांनी सभेची नोटीस व प्रोसेडींग न देणाºया अधिका-याला जवाब विचारला. ते म्हणाले की, मला व काही सदस्यांना सभेची नोटीस व प्रोसेडींग मिळाली नाही. या प्रोसेडींगवर मला अभ्यास करायचा होता. याला जबाबदार अधिकाºयांनी उत्तर द्यावे. लगेचच सदस्य शालीकराम म्हस्के यांनी मलाही प्रोसेंडीग मिळाली नसल्याचे सांगितले. यावरुन सभागृहात गोंधळ उडाला. यानंतर ज्या अधिकाºयानी नोटीसा व प्रोसेडींग पाठवली नाही. त्या अधिकाºयांवर अध्यक्षांनी कारवाई करावी, अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली.अधिकारी हे मनमानी कारभार करीत आहे. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. अध्यक्षांना अधिकाºयांत काय चाललं हेच माहीत नाही. जिल्हा परिषदेत सध्या हुकुमशाही सुरु असल्याचा आरोपही सदस्यांनी केला. त्यानंतर राष्ट्रगीताने सभेला सुरुवात करण्यात आली. सुभेच्या सुरुवातीस सदस्य अवधूत खडके यांनी सदस्यांना मिळालेल्या निधीबाबत नाराजी व्यक्त केली.त्यानंतर सदस्य जयमंगल जाधव यांनी परत गेलेल्या निधीचा मुद्दा उचलला. ते म्हणाले की, जालना जिल्हा परिषदेचा सर्वात जास्त निधी परत गेला आहे. यात विशेष म्हणजे, पाणी पुरवठा विभागाचे कोट्यवधी रुपये परत जात आहेत. ज्या जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच जिल्ह्याच्या पाणी पुरवठा विभागाचे कोट्यवधी रुपये परत जात आहेत. याला जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी सर्व सदस्यांनी केली. यानंतर सभेत या मुद्यावर गोंधळ उडाला. या सभेला जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पदाधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती होती.निधीच्या मुद्द्याप्रमाणेच अनेक सदस्यांनी आपापल्या भागातील दुष्काळाचा मुद्दा मांडला. काहींनी पाणीटंचाई संदर्भात प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी अध्यक्ष खोतकर यांनी संबंधीत विभागाला गतीने हालचाली करून, पाणीटंचाई आणि दुष्काळाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
३६ कोटी परत गेल्याच्या विषयावरून सभा गाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 1:18 AM