कुठली ना कुठली मौल्यवान वस्तू घरात आणण्याची पंरपरा आहे. त्यामुळे व्यापारी देखील तयारीने असतात. यंदा गेल्यावर्षी प्रमाणेच स्थिती असल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. पाडव्याच्या मुहुर्तावर सोने, चांदी खरेदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे भाववाढ झाली असली तरी अनेकजण सकाळी बाजारात मुहूर्त साधण्यासाठी आले होते. परंतु बाजारपेठेत विशेष करून सराफा बाजारातील सर्व दुकाने बंद दिसून आली.
चौकट
व्यापारी पदाधिकारी पाेलीस ठाण्यात
जालन्यातील बाजारपेठ सुरूच ठेवावी म्हणून व्यापारी महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी जालन्यातील सदरबाजार पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. व्यापारी आणि पोलिसांमध्ये चर्चेची फेरी सुरू असतानाच दोन्ही बाजूंनी आमचेच कसे खरे आहे, हे पटवून दिले जात होते. तर दुसरीकडे बाजारपेठेत सर्वत्र गोंधळाचे वातावरण दिसून आले.
चौकट
सराफा बाजार सुनासुना
गुढीपाडव्याला नेहमी गजबजलेला सराफा बाजार यंदा गेल्यावर्षी प्रमाणेच सुनासुना आहे. यंदा सकाळी काहीवेळ सुरू झालेला बाजार पोलिसांनी फिरून बंद केल्याने मोठी अडचण झाली. एकूणच आज आम्हाला मोठ्या उलाढालीची अपेक्षा होती. परंतु ती देखील पूर्ण झाली नाही. आता पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने आमचा व्यवसाय आणखी खोलात जाणार आहे.
भरत जैन, सराफा व्यापारी, जालना