लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दूधाला वाढीव पाच रूपयांचा दर द्यावा या मागणीवरून स्वाभिमानी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाचा फटका जालन्याला बसला आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या दूध पिशवीच्या दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.पश्चिम महाराष्ट्रातून येणाºया दूधाच्या गाड्या न आल्याने दूधाच्या पिशव्यांची थोडीबहुत टंचाई दिसून आली. जिल्ह्यात विविध नामवंत ब्रँडचे पॅकबंद दूध मोठ्या प्रमाणावर येते. जवळपास दहा हजार लिटर दूध बाहेरच्या जिल्ह्यांतून जालन्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या दूध पुरवठ्यावर ५० टक्के परिणाम झाल्याचे दूध विक्रेत्यांनी सांगितले. माऊली ब्रँडच्या दुधाच्या दोन गाड्या न आल्याने याची किरकोळ टंचाई जाणवल्याचे सांगण्यात आले. जालन्यातील दूध शीतकरण केंद्रावर मात्र, दूध बंद आंदोलनाचा फारसा परिणाम जाणवला नाही.नेहमीप्रमाणे जाफराबाद तालुक्यातील माहोरा तसेच विदर्भातील देऊळगावराजा येथून या दूध शीतकरण केंद्रात दूध येते.या दोन ठिकाणांसह जालन्यातील जवळपास दहा हजार लिटर दूध येथे संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाते. जालन्यातील दूध शीतकरण केंद्रात दररोज २४ हजार ७०० लिटर दुधाचे संकलन होत असल्याची माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकारी एस. एन. अदमाने यांनी दिली.दूध संकलन केंद्रावर कुठला गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचेही अदमाने यांनी सांगितले.पोलीस बंदोबस्तजालना येथील जुन्या एमआयडीसीमध्ये दूध शीतकरण केंद्र आहे. या दूध शीतकरण केंद्रावर दूध संकलनास अडथळा येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच बाहेरील जिल्ह्यातून येणा-या दुधासाठी जर संबंधित दूध उत्पादकांनी पोलीस संरक्षण मागितल्यास ते देखील तातडीने पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बाहेरून येणारे दूध घटले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:53 AM