शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

दुष्काळाच्या मदतीपासून मंठा वंचित राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:27 AM

पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

ठळक मुद्देबबनराव लोणीकर : मंठा तालुक्यातील पिकांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : पावसाच्या अवकृपेने यावर्षी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीके धोक्यात आली असून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. पावसाने खंड दिल्याने पिकांची स्थिती बिकट असून उत्पादनात प्रचंड घाट होणार आहे. अत्यंत कमी प्रमाणात पर्जन्यमान झाले आहे. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील पीके संकटात आलेली असून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. एकंदरीतच दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.पालकमंत्र्यांनी शनिवारी जालना व मंठा तालुक्यातील काही गावातील पिकांची पाहाणी करुन शेतकºयांशी संवाद साधला.शेतकºयांच्या पीकांसह दुष्काळसदृश्य परिस्थितीचा तात्काळ सर्वे करून त्याचा अहवाल शासनास देण्यात यावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिले.यावेळी पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, मंठा तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यात होणार नसल्याची खोटी अफवा अलीकडेच व्हाट्सअप व फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर मी मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. याची दाखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंठा तालुक्यामध्ये टंचाई व पिक पाहणी परिस्थितीचा फेर आढावा घेण्याचे आदेश प्रशासनास दिले आहे. मंठा तालुक्यातील शेतकºयांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.यानंतर त्यांनी मंठा येथे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, कृषी अधिकारी माईणकर, झनझन, एसडीएम ब्रिजेश परील, तहसीलदार सुमन मोरे, भाऊसाहेब कदम, गणेश खवणे, बिडी पवार, नाथराव काकडे, नरसिंग राठोड, नागेश घारे, शिवदास हनवते, शंतनू काकडे, प्रकाश टाकले, संभाजी खंदारे, पंजाब बोराडे, विष्णू फुफाटे, राजेश म्हस्के, अविनाश राठोड, नारायण काकडे, सतीश निर्वाळ, सुभाष राठोड, प्रकाश नानवते, कल्याण कदम, तुकाराम वैद्य यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकरAgriculture Sectorशेती क्षेत्र