शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

बोगस मतदानावरून भाजप आमदार नारायण कुचे आणि सेनेचे संतोष सांबरे यांच्यात बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 4:39 PM

BJP and Mahavikas Aghadi supporters Clashed: ज्ञानगंगा शाळा आणि मोसंबी संशोधन केंद्रातील मतदान केंद्रावर झाला प्रकार

बदनापूर ( जालना ) : शहरात नगरपंचायतच्या मतदाना प्रसंगी दोन ठिकाणी बोगस मतदार आक्षेपच्या कारणामुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये बाचाबाची, हाणामारीचा प्रकार घडल्यामुळे या निवडणुकीला शेवटच्या दिवशी गालबोट लागलेले दिसले. एका घटनेत भाजपचे आमदार नारायण कुचे आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार संरोष सांबरे यांच्या बाचाबाची झाल्याची माहिती आहे (MLA Narayan Kuche and Shiv Sena's Santosh Sambre clashed). 

शहरातील पहिला प्रकार ज्ञानगंगा शाळेतील केंद्रात  झाला. या ठिकाणी बोगस मतदार येत असल्याची माहिती मिळाल्यावरून भाजपा व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे राहिले. दरम्यान, आमदार नारायण कुचे व माजी आमदार संतोष सांबरे तेथे पोहोचले. दोघांमध्येही एकमेकांवर बोगस मतदानाचे आरोप करत जोरदार बाचाबाची झाली. 

तसेच दुसरी घटना जालना-औरंगाबाद महामार्गावरील मोसंबी संशोधन केंद्रातील मतदान केंद्रावर झाली. येथे महाविकास आघाडी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बोगस मतदार येत असल्याच्या कारणावरून जोरदार बाचाबाची झाली. येथे माजी सरपंच तथा माजी नगरसेवक राजेंद्र जयस्वाल काँग्रेसचे शहराध्यक्ष मोबीन खान व अन्य पदाधिकारी तेथे गेले. त्यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता गर्दीतून अचानकपणे राजेंद्र जयस्वाल यांना मारहाण झाली. यामुळे जैस्वाल खाली पडले. त्यानंतर तेथे एकच गोंधळ उडाला. लागलीच पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दी पांगवली. 

बोगस मतदान रोखलेयाविषयी आमदार नारायण कुचे म्हणाले की, विरोधी पक्षाने काही लोकांना हाताशी धरून बोगस मतदार आणण्याचा प्रयत्न केला आमच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदान रोखल्यामुळे बाचाबाची झाली.

विरोधक बिथरले आहेत माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की, शहरात महाविकास आघाडी झाल्यामुळे विरोधक बिथरले आहेत विरोधकांनी बोगस मतदार ग्रामीण भागातले मतदार येथे आणून मतदान करण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांन हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला व त्यातून हा प्रकार घडला

मला मारहाण झाली माजी सरपंच माजी नगरसेवक राजेंद्र जयस्वाल म्हणाले की, तेथे बोगस मतदानावरून बाचाबाची सुरु झाली होती. हा प्रकार वाढू नये याकरिता मी तेथे जाऊन सोडवा सोडव करण्याचा प्रयत्न केला असता मला मारहाण करण्यात आली. या विषयी काँग्रेसचे शहराध्यक्ष मोबीन खान म्हणाले की, तेथे माझे भाऊ हे सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. 

अद्याप कोणाचीही तक्रार नाहीत्याविषयी येथील पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवड म्हणाले की, तेथे बाचाबाची झाली असल्याचा प्रकार कानावर आला आहे. मात्र तेथे मारामारी झालेली नाही, तेथे उपस्थित असलेल्या आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून गर्दीला पांगवले. याविषयी अद्याप कोणाची तक्रार आलेली नाही.

टॅग्स :JalanaजालनाBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVotingमतदान