शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी
2
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
3
मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना
4
Womens T20 World Cup : इंग्लंडला पराभवाचा धक्का; वेस्ट इंडीज उपांत्य फेरीत
5
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
6
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
7
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
8
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
9
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
10
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
11
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
12
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
13
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
14
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
15
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
16
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
17
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
18
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
19
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
20
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

आमदार, खासदारांनो राजीनामे नको, मुंबईतच थांबा; मनोज जरांगेंनी सांगितली वेगळीच रणनिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:44 PM

राज्यातील अनेक आमदार, खासदार राजीनामा देत आहेत, तर अनेकांनी मुंबई गाठून राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.

जालनाआपण कोणाला राजीनामा द्या म्हटलं नाही. आमदारकी, खासदारकीचा राजीनामा देताना समाजाचा तोटा होणार नाही याचा विचार व्हावा. तसेच सर्व आमदार, खासदारांनी, माजी मंत्र्यांनी मुंबईत थांबून आरक्षण मिळेपर्यंत शासनाचा पिच्छा सोडू नका, असे आवाहन आज मनोज जरांगे पाटील यांनी केले. अनेक आमदार, खासदार राजीनामा देत आहेत, या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी केलेले आवाहन आंदोलनाच्या वेगळी रणनीती ठरू शकते.

आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. राज्यातील काही मराठा आमदार, खासदारांनी राजीनामा दिला. अनेकांनी मुबईत गाठली असून, तेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.  दरम्यान, सकाळी जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जरांगे म्हणाले, काही आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा का दिला आहे, हे माहीत नाही. त्यांना आम्ही राजीनामा देण्यास सांगितले नव्हते. त्यांच्या राजीनामा दिल्यामुळे मराठा समाजास काय फायदा होणार आहे आणि काय तोटा होईल, हे माहीत नाही. आमदारकी किंवा खासदारकी असेल तर ते सरकारवर दबाब तरी आणू शकतील. परंतु राजीनामे दिले तर ते रिकामे बसतील. आम्हीही रिकामे आणि तेही रिकामे. आत बोलायला कोणी तरी पाहिजे. त्यामुळे सर्व आमदार, खासदारांनी, माजी मंत्र्यांनी मुंबईत थांबून आरक्षण मिळेपर्यंत शासनाचा पिच्छा सोडू नये अशी वेगळी रणनीती जरांगे यांनी सांगितली.

आता थोडा समाज बाकी आहेगोदरच ६० टक्के मराठा ओबीसी आरक्षणात गेला आहे. थोडे राहिले आहेत.त्यामुळे एकदम ५ कोटी समाज ओबीसीत येईल हा गैरसमज दूर करा. उर्वरित थोडा समाज बाकी आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन घेवून मराठा समाजाला आरक्षण द्या, त्याला चॅलेंज होणार नाही. ज्यांना घ्यायचे ते घेतील ज्यांना घ्यायचे नाही ते घेणार नाहीत. परंतु, अर्धवट आरक्षण घेणार नाही, असेही जरांगे म्हणाले. तसेच आपल्या आई-बापाच्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आली आहे. शांततेचे युद्ध आपण जिंकणार आहोत. पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात काय होते ते पाहू. आणखी आंदोलनाचा तिसरा व चौथा टप्पा बाकी आहे. बंद करून काय होणार. थोडे थांबा आपण पाहू काय होते ते. बंद करू नका, उद्रेक करू नका, असे आवाहन आज मनोज जरांगे पाटील यांनी केले

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाMLAआमदारMember of parliamentखासदार