लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आगामी लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर मॉकपोल घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ५० मॉकपोल घ्यावे लागणार असून, यासाठी सकाळी ६.३० वाजता मतदान केंद्र सुरू करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.यंदाच्या निवडणुकीत जालना लोकसभा मतदार संघात प्रथमच व्हीव्हीपॅट मशीनचा उपयोग करण्यात येणार आहे. या मशीनमुळे मोकपोल घेण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. हे मॉकपोल घेतल्यावर त्याची मोजणी करून संबंधित पक्षाच्या बुथ प्रतिनिधीला ते दाखवून त्याची मोजणी करण्यात येणार आहे. व्हीपॅट मशिनवर हे मतदान दिसणार असून, एक व्हीपॅट मशिनवर मतदाराने केलेले मतदान हे सात सेकंद दिसते. त्यानंतर बीप वाजल्यानंतरच दुसऱ्याला मतदान करता येते. तसेच त्यातील चिठ्ठी संबंधित मतदाराला एक आणि दुसरी चिठ्ठी ही मतदान केंद्राध्यक्षांकडे सोपविली जाणार आहे.मॉकपोलमुळे सकाळच्या सत्रातील वेळ बराच खर्ची होणार आहे.ग्रामीण भागात एरवी देखील मतदान करण्यासाठीच्या रांगा या एक तर सकाळी ९ वाजे पर्यंत असतात किंवा सायंकाळी चार वाजेनंतर लागतात. शेतीतील कामे करण्यासह रोजगारासाठी नागरिकांना जावे लागत असल्याने ही वेळ ते मतदान करण्यासाठी निवडतात. त्यातच मॉकपोलमुळे यावेळेत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.साडेसतरा लाख मतदारांकडे ओळखपत्रजालना लोकसभा मतदार संघामध्ये एकूण १८ लाख ४३ हजार १३१ एवढे मतदान आहे. त्यापैकी जवळपास १७ लाख ७८ हजार ७८० जणांकडे ओळखपत्र आणि त्यावर छायाचित्र आहे. जवळपास ९६.८२ टक्के मतदारांकडे ओळखपत्र असून केवळ ५८ हजार ६७५ जणांकडे ओळखपत्रावर छायाचित्र नसल्याचे दिसून आले.व्हीपॅट मशीन हे प्रत्येक केंद्रावर दिले असले तरी, त्या विधानसभा मतदार संघातील कुठल्याही सहा केंद्रातील व्हीपॅटच्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मतमोजणीलाही बराच विलंब लागू शकतो.एकूणच यंदा मतदान जास्तीत जास्त व्हावे म्हणून प्रशासनाकडून मोठे प्रयत्न चालविले जात आहेत. मतदान संकल्पपत्र भरून घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून आले.
मॉकपोल मतदान ठरणार डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:07 AM