जालना : मागील दोन महिन्यांपासून मोगरा, गुलाबासह इतर फुलांना बाजारपेठेत किलोमागे पाच-दहा रूपयांचा दर मिळत आहे. कमी दरामुळे उत्पादन खर्चही हाती पडत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी परतूर (जि.जालना) येथील मुख्य रस्त्यावर, गटारीत ही फुलं फेकून संताप व्यक्त केला.
परतूर तालुक्यातील चिंचोली व परिसरातील शेतकरी गत काही वर्षापासून फुलशेती करीत आहेत. या भागात गुलाब, निशिंगध, मोगरा, काकडा यासह इतर फुलांचे उत्पादन घेतले जाते. फुलांच्या बागेची लागवड असो किंवा वर्षीराचा खर्च असो तो अधिक प्रमाणात करावा लागतो. बागेत रोगराई होवू नये म्हणून आठवड्यातून दोन वेळेस फुलांवर फवारणी करावी लागते. शिवाय फुलांच्या ताेडणीसाठी मजुरांवर होणारा खर्च, माल बाजारपेठेत नेण्यासाठी होणारा खर्च हा वेगळाच आहे. परंतु, गत काही महिन्यांपासून संभाजीनगर येथील बाजारपेठेत फुलांपाच पाच ते २० रूपये किलाेचा भाव मिळत आहे. सद्यस्थितीत तर हा दर पाच- दहा रूपयांवर आला आहे. त्यामुळे वाहतूक खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी शेतातून तोडलेली फुले बाजारपेठेत न नेता परतूर येथील मुख्य रस्त्यावर, गटारीत फेकून संताप व्यक्त केला. शेतकरी ही फुलं फेकत असल्याचे पाहून उपस्थित नागरिकांची मनेही हेलावून गेली होती.
हाती काहीच उत्पन्न नाही मी पाच वर्षापासून फुलशेती करीत आहे. फुलशेती करताना शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. बाजारपेठेत चांगले दर मिळाले तरच चार पैसे हातात पडतात. परंतु, गत काही महिन्यांपासून दर खालावले असून, आमच्या हाती काहीच उत्पन्न पडत नाही.- डिगांबर कातारे, चिंचोली
बाजरात माल आणणे देखील परवडत नाही फुलशेतीला आठवड्यातून एक वेळेस फवारणी करावी लागते. मशागतीसह खत व इतर बाबींवर होणारा खर्च अधिक आहे. शिवाय माल बाजारपेठेत नेण्यासाठी चार रूपये किलोने पैसे द्यावे लागतात. परंतु, घसरलेले दर पाहता माल बाजारात पाठविणेही परवडत नाही.- भागवत चव्हाण, चिंचोली
बाजारपेठेतील किलोच्या दराची स्थितीफुलाचा प्रकार- पूर्वीचे दर- आताचे दरगुलाबाला ३० ते १५०- ५ ते १०निशिंगधला ४० ते २००- २० ते ३०मोगरा २०० ते २५०- ३० ते ४०काकडा १०० ते २००- ३० ते ४०गलांडा २० ते २५- ५ ते १०