जाफराबाद : येथील भारतीय स्टेट बँकच्या शाखेतील खात्यातून देशातील वेगवेगळ्या राज्यात ठिकाणी परस्पर रक्कम काढल्या जात असून, बँकेच्या ग्राहकांना अज्ञात व्यक्ती आर्थिक गंडा घालत असल्याचे प्रकार गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने घडत आहे.या प्रकरणी ग्राहकांनी बँकेला तक्रारी देवून सुद्धा खातेदारांच्या रकमा अद्याप परत मिळालेल्या नाही.या घटनेचा ग्राहकांनी निषेध व्यक्त करत दोन दिवसात पैसे मिळाले नाही.तर बँकेचा व्यवहार ठप्प करण्यात येऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.भारतीय स्टेट बँकेच्या जाफराबाद शाखेतून ३० एप्रिल आणि १ मे रोजी शरद पांडुरंग गाडेकर यांनी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार न करता अज्ञात व्यक्तीने काढलेल्या १ लक्ष १७ हजार ५३२ रुपयाच्या मुद्यावरुन शुक्रवारी सकाळ पासुनच बँकेच्या जाफराबाद शाखेत नागरिकांनी गर्दी करत शाखाधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत खात्यावर पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत बँका सोडत नाही असा आक्रमक पवीञा यावेळी जमलेल्या नागरीकांनी घेतला.शाखा व्यवस्थापक व नागरिकात चांगलीच हुज्जत झाल्यानंतर बँकेत पोलिसांना बोलावून गर्दी कमी करण्यात आली. नळविहिरा येथील शेतकरी शरद पांडुरंग गाडेकर यांच्या एसबीआय बँक शाखा जाफराबादच्या खात्यातून एका अज्ञात व्यक्तीने १ लक्ष १७ हजार रुपये काढले होते. त्यामुळे नळविहिरा येथील ग्रामस्थांनी बँकेत तक्रार करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पैसे परत मिळाले नाही तर मंगळवार पासून बँकेसमोर लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचे लेखी पत्र यावेळी शरद गाडेकर यांनी बँके व पोलिसांना दिले.जाफराबाद शाखेतील ही मागील दोन महिन्यातील चौथी घटना असल्याचे यावेळी उघड झाले. यामध्ये हिवराबळी येथील शेतकरी कैलास सुसर यांचे ८० हजार रुपये, पिंपळखुटा येथील अमोल खंबाट यांचे २५ हजार ५०० रुपये तर आरतखेडा येथील गणेश राऊत यांचे ८ हजार पाचशे रुपये अज्ञात व्यक्तीने काढल्याच्या तक्रारी बँकेत व पोलिसात दाखल करण्यात आलेल्या आहे. अशा अनेक तक्रारी असल्याचे यावेळी नागरिक म्हणाले.पोलिसात ठाण्यात जावून चारही प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी यासाठी नागरिकांच्या जमावाने शाखाधिकारी व बँक कर्मचाºयांना पोलिसात बोलावून चांगलाच दम दिला. पोलीस व बँकेकडून दाखल तक्रारीवर तात्काळ चौकशी करण्यात येईल असे आश्वासन यावेळी शाखाधिकारी व पोलिसांनी दिले.
खात्यावरून पैसे गायब; ग्राहकांचा शाखाधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:14 AM
येथील भारतीय स्टेट बँकच्या शाखेतील खात्यातून देशातील वेगवेगळ्या राज्यात ठिकाणी परस्पर रक्कम काढल्या जात असून, बँकेच्या ग्राहकांना अज्ञात व्यक्ती आर्थिक गंडा घालत असल्याचे प्रकार गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने घडत आहे.
ठळक मुद्देजाफराबाद शाखा: भारतीय स्टेट बँकेसमोर ग्राहकांची एकच गर्दी, खातेदारांना अज्ञात व्यक्तीने घातला आॅनलाईन गंडा