लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. काही भागात सायंकाळी जोरदार हवा सुटली. गोलापांगरी शिवारात साडेचारच्या सुमारास काळी वेळ वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.मान्सूनची चाहूल लागल्यामुळे जिल्ह्यात ४२ अंशावर गेलेला मान्सूचा पारा हळूहळू कमी होत चालला आहे. ग्रामीण भागात खरीपपूर्व मशागतींची कामे जोरात सुरू आहेत. जालना व जाफराबाद तालुक्यातील काही शेतक-यांनी ठिबक सिंचन अंथरून कपाशी लागवडीची तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बदनापूर शिवारात १५ ते २० मिनिटे पाऊस झाला. या पावसामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.जालना तालुक्यातील गोलापांगरी, आलमगाव, शेवगा या भागात पावसाने वादळी वा-यासह हजेरी लावली.गोलापांगरी परिसरात मुख्य रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडल्यामुळे जालना-अंबड मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. जालना शहर परिसरातही सायंकाळी पावसाचा हलका शिडकावा झाला.
मान्सूनची चाहूल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:58 AM