लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मनाची व बुद्धीची भूक ही सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या महोत्सवातून पूर्ण होत असते, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.कलश सिड्स मैदानावरील स्व. शारदादेवी पित्ती नगरीत आयोजित जालना महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची तर प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, ललित गांधी, ओमप्रकाश शेटे, राधेशाम चांडक, विशाल अग्रवाल, द्वारकादास सोनी, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, भावेश पटेल आदींची उपस्थिती होती.यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, १९८० पासून आपला व जालना शहराचा संपर्क आहे. अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या अभ्यासवर्गाला जालना येथे आपण आलो होतो. या जिल्ह्याविषयी आपली आपुलकी आहे. शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींशी आपला संपर्क आला. महाविद्यालयीन जीवनापासून कार्यकर्ता असल्याने समाजाचे प्रश्न व समस्या जाणतो. व्यक्तीचा विकास होणे आज गरजेचे असून, राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली असल्याचे सांगून, शहरात जालना महोत्सवासारखे विविध कार्यक्रम, उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी महोत्सव समितीचे कौतुक केले.यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल म्हणाल्या, जालना महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आहे. शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय समारोपप्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, महोत्सवा दरम्यान झालेल्या उपक्रमाबद्दल माहिती देऊन महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. यावेळी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, श्रीपती पळसुळे, गुणवंत, ब्रिजमोहन लड्डा, सुभाषचंद्र देविदान, गोविंदप्रसाद मुंदडा, मनिष तवरावाला, डॉ. नीता जैन, विजय जैन, पवन जोशी, उमेश पंचारिया, सुनील राठी, सुनील दायमा आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर कवी सुरेंद्र शर्मा, अरूण जेमिनी, महेंद्र अजनबी, संपत सरळ, आजकरण अटल, वेदप्रकाश, मनोहर माथूर आदींच्या उपस्थितीत महामूर्ख कविसंमेलन पार पडले.स्मरणिकेचे प्रकाशन : प्राईड आॅफ जालनाया जालना महोत्सवानिमित्त डॉ. रावसाहेब ढवळे यांच्या संपादनाखाली काढण्यात आलेल्या ‘प्राईड आॅफ जालना’ या स्मरणिकेचे प्रकाशन चंद्रकांत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आहे.यावेळी जिल्ह्यात विविध क्षेत्रांत नावलौकिक कमावलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमंत्री वीरेंद्रप्रकाश धोका यांनी केले.
मनाची, बुद्धीची भूक महोत्सवात पूर्ण होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:09 AM