आशा वर्कर कृती समितीची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. तेथेही तोडगा निघाला नाही. आता येत्या आठवडाभरात तोडगा न निघाल्यास आम्ही सर्वजणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालन्यातील निवासस्थानी मोर्चा काढू, असा इशारा यावेळी झालेल्या जाहीर सभेत देण्यात आला. यावेळी सतकरभुवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता. त्यात जिल्हाभरातून आशा वर्कर सहभागी झाल्या होत्या.
यावेळी कामगार नेते अण्णा सावंत, गाेविंद आर्दड, मंदाकिनी तीनबोटे, कल्पना आर्दड, मिना भोसले, अजित पंडित, आदींची उपस्थिती होती.
आठ हजार रुपये मानधन द्यावे
आशा वर्करला राज्य सरकारने दर महिन्याला आठ हजार रुपये मानधन द्यावे तसेच त्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच हे आरोग्य कर्मचाऱ्याप्रमाणे लागू करावे सेवेतून कमी करू नये. लसीकरणासाठी आशा वर्करला ड्युटी देऊ नये, या अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी शिष्टमंडळाने दिले.