लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपूरी : घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील सात पैकी पाच आरोपींना गोंदी पोलिसांनी रविवारी अटक केल्याची माहिती देण्यात आली. २ डिसेंबरला बाबूराव भगवान राऊत यांचा खून झाला होता. त्यात बाबूरावचे वडील भगवान हे देखील जखमी झाले होते. त्यांचा औरंबाादेतील घाटी रूग्णालयात उपचार सुरू असताना १० डिसेंबरला मृत्यू झाला होता.मुद्रेगाव येथे बाबूराव राऊत व त्यांच्या भावकीत शेतातील रस्त्याच्या वादावरून जुना विवाद होता. २ डिसेंबरला बाबूराव राऊत हे शेतात जात असताना त्यांना रस्त्यात अडवून जबर मारहाण करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याच हाणामारीत बाबूरावचे वडील भगवानराव राऊत हे देखील गंभीर जखमी झाले होते. त्यांनाा अधिक उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रूग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा दहा डिसेंबरला उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यावेळी भगवानराव राऊत यांच्या नातेवाईकांनी जो पर्यंत या प्रकरणातील आरोपी अटक होत नाहीत, तो पर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र मध्यस्ती केल्यानंतर हा तिढा सुटला.दरम्यान या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी गोंदी पोलीस मागावर होते. हे आरोपी परभणी जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यावरून गोंदी पोलिसांनी संशयित आरोपी गोविंद राऊत, गोपाल राऊत, संभाजी राऊत, शिवाजी राऊत, तसेच माजलगाव तालुक्यातील राऊत यांचा नातेवाईक तुकाराम शेजूळ यांना अटक करण्यात आल्याचे गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल परजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, जमादार पगारे, करंडे, शिंदे या आरोपींना अटक केली.
मुद्रेगाव खून प्रकरण : पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:32 AM