लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेतील अनेक प्रकरणांमध्ये निकष डावलून कामे झाली आहेत. या सर्व कामांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके यांनी शनिवारी केली.येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पालिकेने फेरीवाला धोरण न राबविणे, जलवाहिनीचा नियोजित आराखडा बदलणे, चढ्या दराने निविदा मंजूर करणे, घनकचरा प्रकल्प यासह अन्य विविध विकास कामांमध्ये निकष डावलून चुकीचा पद्धतीने देयके अदा केली आहेत, असा आरोप शेळके यांनी पत्रकार परिषदेत केला.‘त्या’ आरोपात तथ्य नाहीअनिरुद्ध शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या कामकाजावर जे आरोप केले आहेत, त्यात तथ्य नाही, हे आरोप राजकीय हेतूने प्ररित आहेत. त्यामुळे शेळकेंच्या आरोपाला महत्त्व देत नाही. निकषानुसारच कामे केली आहेत.- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्ष
पालिकेची एसीबीकडून चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:08 AM