शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

खून प्रकरणातील आरोपी चार महिन्यांनंतर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:08 AM

मजूर पुरवठ्याच्या कारणावरून एका कंत्राटदाराचा खून केल्याप्रकरणातील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, भोकरदन पोलिसांनी बुधवारी मध्य प्रदेशातील खुर्दी गावाच्या परिसरातून जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मजूर पुरवठ्याच्या कारणावरून एका कंत्राटदाराचा खून केल्याप्रकरणातील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, भोकरदन पोलिसांनी बुधवारी मध्य प्रदेशातील खुर्दी गावाच्या परिसरातून जेरबंद केले. ही घटना ७ आॅक्टोबर रोजी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे घडली होती.शेलगाव येथील संजय किसनराव अंभोरे यांचा ७ आॅक्टोबर रोजी २०१९ रोजी सायंकाळी गोळ्या घालून खून केला होता. या प्रकरणात पाच जणांविरूध्द बदनापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तिघांना जेरबंद केले होते. या प्रकरणातील आरोपी राजसिंग उर्फ कुलदीपसिंग शामसिंग कलानी हा घटनेनंतर फरार होता. कलानी हा मध्य प्रदेशातील मानपूर ठाण्याच्या हद्दीतील खुर्दी गावात असल्याची असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा व भोकरदन पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने बुधवारी खुर्दी गावाच्या परिसरात कारवाई करून राजसिंग उर्फ कुलदीपसिंग शामसिंग कलानी याला जेरबंद केले. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. अधिक तपास भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय हे करीत आहेत. मोक्का न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती तपासाधिकारी जायभाय यांनी दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय, स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पठाण, पोकॉ जगदीश बावणे, पोकॉ गणेश पायघन, सागर देवकर, सोमनाथ उबाळे, रवी जाधव यांच्या पथकाने केली.व्हॉटसअ‍ॅपवरून काढला आरोपीचा मागशेलगाव येथील खून प्रकरणातील आरोपी मध्य प्रदेशातील खुर्दी येथे राहत होता. तो मोबाईलचा उपयोग करायचा. मात्र, विना सीमकार्डचा मोबाईल वापरून तो केवळ व्हॉटस्अ‍ॅप कॉलिंगवर संपर्कात होता. त्यामुळे आरोपीचा माग काढणे पोलिसांसमोर आव्हान होते. बऱ्याच तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आमचे पथक आरोपीपर्यंत पोहोचले.- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना

टॅग्स :MurderखूनArrestअटकCrime Newsगुन्हेगारी