लोकमत न्यूज नेटवर्कसेवली : जालना तालुक्यातील सेवली येथे एका २२ वर्षीय युवकांचा चाकूचा हल्ला करुन खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. तुषार विश्वनाथ खाडे (२२, रा. वरखेड, ता. जि. जालना) असे युवकाचे नाव आहे. दरम्यान, अवघ्या ९ तासांत पोलिसांनी या खुनाचा तपास लावून तीन आरोपींना ताब्यात घेतले.शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तुषार विश्वनाथ खाडे (२५) या तरुणाचा गावातीलच काहींनी अनैतिक संबंधातून कुºहाड व धारदार हत्याराने मारहाण करून खून केला. खुनानंतर तरुणाचे प्रेत एका पुलाच्या नळकांडीमध्ये लपवून खुनी फरार झाले होते. या खूनाची माहिती कळताच मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांना आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते.दरम्यान घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, परतूरचे उपविभागीय अधिकारी सीडी. शेवगन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.यानंतर दुपारी पोलिसांनी चार संशयित सचिन भास्कर खाडे, नितीन भास्कर खाडे, दत्ता भानुदास खाडे, मारोती खाडे यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. या चौकशीवरुन पोलिसांनी मुख्य आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी आरोपीचा माग काढत बीबी, लोणार, सिंदखेडराजा, असा शोध घेत तब्बल १२ तासाच्या शर्थीच्या प्रयत्नाने प्रमुख दोन आरोपी असलेल्या राहुल भास्कर खाडे (२५) आणि मछिंद्र उर्फ बाळू मारोती खाडे (२४) यांच्या मुसक्या आवळल्याचे गौर यांनी सांगितले.या दोघांना जालना एमआयडीसी परिसरात अटक करण्यात आली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. या खुनाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार याच्या मार्गदर्शनाखाली सपोनि फुलचंद मेंगडे हे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, सेवली ठाण्याचे सपोनि फुलचंद मेंगडे, बिट जमादार पी. एल. राठोड, चेके, नागरगोजे, शेख खाजा, शरद पवार, घोडके, वाहुळे, लोढें यांनी परिश्रम घेतले.
सेवलीत अनैतिक संबंधातून युवकाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:43 AM