जालना : आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे व शिवसेनेचे नेते हिकमत उढाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेल्या घनसावंगी नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळविली आहे.
मतमोजणी अंती १७ प्रभागांचा निकाल जाहीर झाला असून, राष्ट्रवादीने १० जागावर विजय मिळवत शिवसेनेला पराभूत केले आहे. निवडणुकीत शिवसेनेला ७ जागांवर विजय मिळविता आला आहे. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन प्रमुख पक्षात थेट लढत झाली आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची झाली. निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार निकाल प्रभाग १: विघ्नहार राठोड -विजयी ( राष्ट्रवादी ) प्रभाग २ : यादव देशमुख- विजयी ( शिवसेना ) प्रभाग ३ : यशवंत देशमुख -विजयी ( राष्ट्रवादी )प्रभाग ४ : पांडुरंग साळवे- विजयी ( शिवसेना )प्रभाग ६ : शेख मुमताज- विजयी (राष्ट्रवादी) प्रभाग ७ : सय्यद सलीमाबी सय्यद गफुर- विजयी (राष्ट्रवादी) प्रभाग ९ : फरहद मुजाहेद खांन- विजयी (शिवसेना) प्रभाग ११ : पांडुरंग मुरलीधर कथले- विजयी (राष्ट्रवादी) प्रभाग १२ ; शोभा दादाराव गायकवाड विजयी (राष्ट्रवादी)प्रभाग १३ : बापू कथले -विजयी (शिवसेना)प्रभाग १४ : राजेश्री प्रल्हाद नाईक विजयी (राष्ट्रवादी)प्रभाग १६ : जयश्री सचिन देशमुख विजयी (शिवसेना)प्रभाग १७ : गणेश हिवाळे -विजयी (राष्ट्रवादी)प्रभाग ८ : शिवाली शंतनु देशमुख -विजयी (शिवसेना)प्रभाग १०: स्मिता मिलिंद काळे -विजयी(राष्ट्रवादी)प्रभाग ५ : जमील रशीद सौदागर- विजयी (राष्ट्रवादी )प्रभाग १५: रेहनाबी फय्याज पठाण- विजयी (शिवसेना)
जालन्यात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्वदरम्यान, जिल्ह्यातील पाचही नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. बदनापूरमध्ये महाविकास आघाडीचा पराभव करून भाजपने ९ जागांवर विजय मिळविला आहे. तर घनसावंगी, तीर्थपुरी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय संपादित केला असून, मंठ्यात शिवसेनेने पुन्हा बाजी मारली आहे. जाफराबादमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठ सदस्य आणि कॉंग्रेसचे तीन सदस्य विजयी झाले आहेत.