तीर्थपुरी : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले असून, केंद्र शासनाने तातडीने इंधन दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी घनसावंगी तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने तीर्थपुरी येथे गुरूवारी आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या पोस्टाने पाठविण्यात आल्या.
केंद्र शासनाने गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले असून, महिलांवर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, या मागणीसाठी तीर्थपुरी येथे गुरूवारी राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने शेणाच्या गोवऱ्या पाठविण्यात आल्या. तसेच मागणी मान्य न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. हे आंदोलन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने यांच्या सूचनेनुसार करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्षा वंदना पवार, कमल चिमणे, कौशल्या चिमणे, सरस्वती डोरले, रुक्मिणी चिमणे, अयोध्या चिमणे, रुक्मिणी नारायण चिमणे आदी उपस्थित होत्या.
===Photopath===
040321\04jan_4_04032021_15.jpg
===Caption===
तीर्थपुरी येथे आंदोलन