शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा सायकल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:56 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढी विरोधात रविवारी तहसील कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : केंद्र व राज्यात लबाडांचे सरकार असून, या सरकारच्या काळात समाजातील कोणताही घटक समाधानी नसल्याची टीका माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी अंबड येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढी विरोधात रविवारी येथील तहसील कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.आ.टोपे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढलेले नसताना आपल्या देशात इंधनाचे दर का वाढले आहेत. वास्तविक ३५ रुपये लिटरने मिळू शकणारे पेट्रोल ८५ रुपये लिटरने विकत घ्यावे लागत आहे. सरकारने इंधनावर तब्बल ६६ टक्के कर लावला आहे. त्यामुळे दुप्पट किमतीने इंधन खरेदी करावे लागत आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेला आश्वासन देताना महागाई कमी करतो, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावात दीड पट वाढ करु, मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योग आणू, नवीन उद्योग उभारु, रोजगार निर्मिती करू, अशी आश्वासने दिली होती. मात्र शेतकरी, नोकरदार, उद्योजक, विद्यार्थी, कामगार सर्वच घटकांमध्ये या केंद्र व राज्य सरकारविषयी नाराजी आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी आहे. भाजपाच्या सरकारच्या काळात धार्मिक व जातीय विव्देष वाढला असून, अल्पसंख्याक जनतेच्या मनात भीतीचे वातावरण आहे. जनतेचा आक्रोश सरकारला ऐकवण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे ते म्हणाले.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती रघुनाथ तौर, बबलु चौधरी, प. स. उपसभापती बाळासाहेब नरवडे, समद बागवान, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अफरोज पठाण, गटनेते शिवप्रसाद चांगले, अल्पसंख्याक प्रदेश सचिव समद बागवान, बाजार समिती सभापती सतीश होंडे, खरेदी-विक्री संघ चेअरमन भाऊसाहेब कनके, जि. प. सदस्य विष्णूपंत गायकवाड, राजन उढाण, चंद्रमणी खरात, अर्जुन भोजने, संतोष सोमाणी, तकी सिद्दीकी, विक्रम राजपूत, दीपक कुरेवाड, पंकज मणियार, प्रभाकर डोखळे, मनोहर जामदरे, नंदकुमार गायकवाड, श्रीकृष्ण तारख, डॉ योगेश ढेंबरे, जालिंदर बाबर, भरत रत्नपारखे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Petrolपेट्रोलNCPराष्ट्रवादी काँग्रेस