शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

उत्सव साजरे करताना ध्वनि प्रदूषणावर नियंत्रणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:47 AM

भाविकांनी कमीत कमी आवाजामध्ये मंगलवाद्ये वाजविल्यास त्यातून मनाला आनंद तर मिळेलच. शिवाय ध्वनिप्रदूषण रोखण्यासही मदत होईल, असे मत डॉ. संदीप अग्रवाल यांनी व्यक्त केले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्क२ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. त्या पाठोपाठ नवरात्रोत्सव येतो. या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर लाऊडस्पीकर, डी.जे. लावण्यावर मोठा भर असतो. परंतु, हे सर्व करत असताना यातून ध्वनिप्रदूषणही होते. हे टाळण्यासाठी भाविकांनी कमीत कमी आवाजामध्ये ही मंगलवाद्ये वाजविल्यास त्यातून मनाला आनंद तर मिळेलच. शिवाय ध्वनिप्रदूषण रोखण्यासही मदत होईल, असे मत डॉ. संदीप अग्रवाल यांनी व्यक्त केले.ध्वनिप्रदूषण नेमके काय आहे?ज्या प्रमाणे डोळे, ह्दय हे अवयव महत्त्वाचे मानले जातात त्याचप्रमाणे प्रत्येकाचे कान हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. ध्वनिप्रदूषणामुळे अनेकांना बधिरता येण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी पूर्वी भारतीय संस्कृतीत मंगल वाद्य म्हणजेच वाजंत्रीला मोठे महत्त्व होते. आता लाऊडस्पीकरवरच भजन, कीर्तन करण्याची पध्दत रूढ झाली आहे. काळानुरूप ती खरीदेखील आहे. परंतु, त्याचा आवाजही तज्ज्ञांनी घालून दिलेल्या डेसिबलच्या निकषापेक्षा कमी ठेवल्यास कोणालाच त्रास होणार नाही.टाळण्यासाठी कोणते उपाय करावे?आज प्रत्येक ठिकाणी शोर म्हणजेच आवाज ऐकू येतो. यामुळे कधी-कधी ह्रदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. मेंदूवर जास्त आवाजाचा ताण आल्यास कान निकामी होऊ शकतात. हे सर्व गंभीर मुद्दे टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. सण, उत्सव साजरे करताना मर्यादित राहूनच लाऊडस्पीकर अथवा डीजेचा आवाज ठेवावा.विना हॉर्न सिटीची गरजअनेक देशांमध्ये वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविण्यावर पूर्णत: बंदी आहे. हीच पध्दत भारतात राबविणे गरजेचे असून, एक दिवस विना हॉर्नचे वाहन चालविण्याची चळवळ उभी व्हावी.शासनाकडून मदतआज अनेक गोरगरीब रूग्णांना कानावरील महागडी शस्त्रक्रिया अथवा डिजिटल श्रवण यंत्र देणे शक्य नाही. अशांसाठी इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून मदत मिळते. तसेच आम्ही देखील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून गोरगरीब रूग्णांना विशेष करून बाल रूग्णांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करतो, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणGanpati Festivalगणेशोत्सव