जालना : नवनिर्मितीची क्षमता ही स्त्रियांमध्ये उपजत असते. सण-उत्सवांच्या माध्यमातून आपल्यातील कला त्या व्यक्त करतात. महिलांमधील सृजनशीलता अधिक दर्जेदार होण्यासाठी स्पर्धांसारख्या उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी व्यक्त केले.
महालक्ष्मी सणाचे औचित्य साधून करण जाधव यांच्या वतीने आयोजित मखर सजावट स्पर्धेतील विजेत्या महिलांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास आमदार कैलास गोरंट्याल, परीक्षक तृप्ती सैनी, विजया वाघ, करण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात जाधव यांनी स्पर्धा आयोजनामागील हेतू विषद केला. परीक्षक तृप्ती सैनी, विजय वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.
सुरेश सतकर यांनी आभार मानले. यावेळी आशा शेरकर, उज्ज्वला उदार, नंदा ढोबळे, दीपक वाघ, रामेश्वर ढोबळे, नीलेश लोंढे, किशोर राऊत, बंडू काळे, बाबासाहेब नन्नवरे, ज्ञानेश्वर पडोळ, किरण शिरसाट, संजय ठाणगे, अनिरुद्ध झाल्टे, सचिन खरात, कृष्णा खरात, गोपाल ढोबळे, महेश नागवे, लहू सतकर, संतोष चोरमारे, दीपक चोरमारे, पवन जाधव, यश सतकर, किशोर लब्दे, गणेश शहा, अविनाश मगरे, दिगंबर चोरमारे, संजय शिरसाट, गणेश पांडे, कृष्णा शिंदे, सुरेश पतंगे, यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.
फोटो