- संजय देशमुख जालना : कुस्ती हा तसा अस्सल भारतीय खेळ , परंतु सध्या या कुस्तीकडे पूर्वीप्रमाणे राजश्रय नसल्याने हा खेळ किमान महाराष्ट्रात तरी स्वत:च्या हिमतीवर कुस्ती टिकून आहे. क्रिकेटला ज्या प्रमाणात देशात प्रसिध्द मिळाली त्या तुलनेने कुस्तीकडे पूर्वी पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नव्हते. मात्र दंगल आणि सुलतान या चित्रपटातून ज्या प्रमाणे कुस्तीला महत्व देण्यात आले, त्या नंतर मात्र परिस्थिती बदली असून, याखेळाकडे आता युवा पिढी आणि विशेष करून मुलींची संख्याही आता कुस्तीत लक्षणीयरित्या वाढल्याचे मोठे समाधान आहे. सरकार पातळीवरून अनुदान दिले जाते, मात्र ते अत्यंत तोकडे असल्याने त्यातून पहिलवान होणे दूरच राहते. त्यासाठी शासनाने खुराकासाठीच्या अनुदानात वाढ करणे अपेक्षित असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे निमित्त शिंदे तसेच कुस्तीगिर परीषदेचे अन्य पदाधिकारी जालन्यात दााखल झाले आहेत. कुस्तीच्या आखड्यावरच शिंदे यांच्याची बातचित करण्यात आली.
कुस्तीला अच्छे दिनसाठी काय केले पाहिजेकुस्ती हा भारतीयांचा जुना खेळ आहे. अस्सल भारतीय म्हणून या खेळाची ओळख आहे. परंतु हा खेळ म्हणजे व्यायाम आणि श्क्तीचा आहे. केवळ शक्ती असूनही यात चालत नाही. तर समोरचा कशी चाल करत आहे. किंवा तो कोणाता डाव टाकेल यावर लक्ष ठेवावे लागते. हे सर्व करण्यासाठी सुदृढ शरिर कमावण्यासाठी खुराक आणि अन्य पोषक आहाराची गरज असते. ही गरज आज सरकारकडून काही प्रमाणात पुरविली जात आहे. मात्र ते अनुदान तोकडे आहे. ते वाढवून दिल्यास चांगले कुस्तीपटू निर्माण होऊन कुस्तीला चांगले दिवस येऊ शकतात.
कुस्ती परिषदेचे ध्येय, धोरण कोणतीमहाराष्ट्र कुस्तीगिर परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा तसेच महापालिका क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या या संघटनेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या परिषदेची घोडदौड सुरू आहे. पुरूष, महिलांप्रमाणेच युवा खेळांडून प्रोत्सहान देऊन कुस्तीला एक तांत्रिक मान्यता कशी मिळेल याकडे आमचे लक्ष असते. या परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे हे यासाठी प्रशासकीय पातळीवर महत्वाची भूमिका निभावतात असेही शिंदे म्हणाले. कुमार आणि महिलांसाठी स्वतंत्र कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते.
मल्लांसाठी राखीव जागा गरजेच्याकुस्ती हा क्रीडा प्रकार एकास-एक असा आहे. त्यामुळे दोघांनाही प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची ठरते. ही प्रॅक्टिस करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा घेताना विशेषकरून सैन्य आणि पोलीस दलातील प्रश्नपत्रिका या वेगळ्या काढल्यास मल्लांना त्या सोडवितांना अडचणी येणार नाही. परंतु पोलीस आणि सैन्य दलात भरतीच्या वेळी आमचा पहिलवान सर्व बाबतीत सरस ठरतो. केवळ धावण्यासाठीचे जे निकष आहेत, ते पूर्ण करताना मल्लांकडून ते शक्य होत नसल्याने भरती होताना अडचणी येतात.
कुस्तीपटूसांठी परिषदेची कशी मदत होतेमहाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेकडून शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यातील चार नावाजलेल्या मल्लांना दर महिन्याला एक लाख रूपयांचे अनुदान दिले जात आहे. त्यात राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे यांच्यासह अन्य दोन जणांचा समावेश आहे.महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेत सहभागी मल्लांना सध्या केवळ सहभाग तसेच तो ज्या क्रमांने विजयी झाला ते प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येते. हे त्यांच्या भविष्यासाठी महत्वाची भूमिका निभावत असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच कुस्तीसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम पंचाची नियुक्ती करण्यासाठी देखील वेगवेगळ्या पातळीवर परीक्षा घेतल्या जात असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदने महाराष्ट्रसह देशाला अनेक नामवंत पहिलवान दिले असून, त्याची यादी सांगयची म्हटल्यास ती खूप मोठी असल्याचे सांगून एक दैदिप्यमान इतिहास या परिषदेला असून, तेवढेच चांगले वर्तमान आणि उज्वल भविष्य असल्याचे सर्जेराव शिंदे यांनी नमूद केले.