जालना : आज समाजात चढा-ओढ वाढण्यासोबतच अहंकाराची वृत्ती वाढत आहे. एकूणच समस्त मानव जातीचा विचार करता प्रत्येकाने परस्परांत स्नेहभाव वाढविण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन आनंदवाडी राममंदिर संस्थानचे रामदास महाराज आचार्य यांनी केले.
परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित तीळगूळ स्नेहमिलन व कोरोना यौद्धा गौरव सोहळ्यात ते बोलत होते.
कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणार्या यौद्धांचा यावेळी गौरव करण्यात आला. समितीचे अध्यक्ष संजय देशांडे यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आर. आर. जोशी यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. विलास नाईक, चंद्रकांत कुलकर्णी, कल्याण देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, निबंध व हस्ताक्षर स्पर्धेतील १२ गुणवंतांना गौरविण्यात आले. ८ समाजभूषण, तर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या ६० कोरोना यौद्धांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संजय देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष विलास नाईक, आर.आर. जोशी, सिद्धिविनायक मुळे, कल्याण देशपांडे, सुनील जोशी, राजेंद्र देशमुख, रवि जोशी, धनंजय पाटील, चंद्रकांत कुलकर्णी, सुलभा कुलकर्णी, शालिनी पुराणिक, दीपक रणनवरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी अॅड. विनोद कुलकर्णी, अनंत वाघमारे, गजेंद्र देशमुख, अमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, संकेत मोहिदे, कृष्णा दंडे, मुकुंद कुलकर्णी, संतोष जोशी, विश्वंभर कुलकर्णी, दिलीप देशपांडे, शशिकांत दाभाडकर, एल. आर. कुलकर्णी, लक्ष्मीकांत दाभाडकर आदींनी प्रयत्न केले.