लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवयदानासाठी जनजागृती करणाऱ्यांची वानवा आहे. पण, खेड्यापाड्यातील काही कार्यकर्ते नेटाने यासाठी काम करतात. मृत्यूनंतर पक्षी पक्ष्यांच्या कामी येतात. पण, माणसे माणसांच्या मृत्यूनंतर कामी येत येत नाहीत.मानवाच्या देहदानानंतर आठ जणांना जीवदान मिळते. यामुळे अवयवदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून अवदान काय करावे? काय करू नये? किती तासात करावे, याची जनजागृती करण्यासाठी ४० दिवसाची पदयात्रा काढण्यात आली आहे.ही पदयात्रा शुक्रवारी औरंगाबाद येथून निघाली असून ती सोमवारी शहरात येणार आहे. अशी माहिती द फेडरेशन आॅफ आॅर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.देहदान अवयव दानाची जनाजागृती करण्यासाठी ६९ वर्षीय सुनील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली १० जणांची पदयात्रा शुक्रवार (दि. १६) पासून औरंगाबाद येथून निघाली असून ही पदयात्रा औरंगाबाद ते तुळजापूर असा ६६३ कि.मी. चा प्रवास करणार आहे. या प्रवासात रस्त्याने लागणारी गावे, वाड्या, शाळा येथे पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस संस्थेचे समन्वयक डॉ. योगेश ढेंबरे, सचिव सुधीर बागाईतकर, राजेशसिंह सूर्यवंशी, प्रा. रवी पाटील यांच्यासह संस्थेचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते.
अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 1:05 AM