चौकट
नियोजन पूर्ण झाले
जालना जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांना राज्य सरकारच्या योजनेप्रमाणेच आता पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून ही अतिरिक्त गहू आणि तांदूळ मिळणार आहे. त्यासाठीचे नियोजन पूर्ण झाले आहे. हे अन्नधान्य पुढील आठवड्यात येणार असून, रेशनकार्ड धारकांची बैठक घेऊन तशा सूचना दिल्या आहेत.
रिना बसय्ये, जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना
--------------------------------------------------
चौकट
आज कोरोनामुळे रोजगार बुडाला आहे. त्यामुळे गावाकडची वाट धरली आहे येथेही शेतीत काम-धंदा पूर्वीप्रमाणे नाही. त्यामुळे रेशनकार्ड वरील धान्य आणून गुजराण केली जात आहे. रोजगार हमीचा देखील मोठा आधार मिळाल्याने त्यातून थोडाफार रोजगार मिळत आहे.
पांडुरंग काटकर,निधोना
-----------------------------------------------------
आमचा परिवार मोठा आहे. त्यामुळे रेशन वरील अन्नधान्य आम्ही नियमितपणे आणतो. यंदा पुन्हा कोरोना पसरला असून, त्याचा मोठा फटका बसला आहे. आता केंद्र सरकारने अतिरिक्त गहू तसेच तांदळाचा वाढीव साठा मंजूर केला आहे. तो तातडीने मिळावा हिच अपेक्षा
मधुकर खणेपुरीकर, खणेपुरी.
---------------------------------------------
कोरोनाने रोजगारात मोठी घट झाली आहे., यंदा आमचा पारंपरिक माठ तयार करून ते शहरात नेऊन विक्रीचा व्यवसायही ठप्प आहे. शहरात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने फिरण्यास बंदी आहे. त्यामुळे रेशन वरील धान्यावरच आमची मदार आहे. हे धान्य आणखी वाढवून दिल्यास बरीच मदत होईल.
कृष्णा काळे, दगडवाडी तांडा