जालना : कोरोना महामारी ओसरू लागताच प्रवाशांची रेलचेल वाढू लागली आहे. जालना रेल्वे स्थानकातून सोडणाऱ्या देवगिरी, तपोवन व राजाराणी या मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या जालना रेल्वे स्थानकातून सिंकदराबाद ते मुंबई (देवगिरी), मनमाड ते धर्माबाद ( मराठवाडा), मनमाड ते सिंकदराबाद (अंजिठा), नांंदेड ते मुंबई (तपोवन), नांदेड ते मुंबई (राजाराणी), नगरसोल ते नरसापूर, औरंगाबाद ते हैदराबाद, ओखा ते रामेश्वरम् (साप्ताहिक एक्स्प्रेस), नांदेड ते अमृतसर (संचखंड) या गाड्या धावत आहेत. सध्या कोरोनामुळे अनलॉक होताच, नागरिक प्रवास करीत आहे. त्यामुळे बहुतांश जणांना आरक्षण मिळत नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
सध्या मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे, परंतु सिंकदराबादकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. नगरसोल ते नरसापूर या गाड्यांनाही प्रवासी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पॅसेंजर कधी सुरू होणार?
गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. तेव्हा पॅसेंजर रेल्वे बंद आहेत.
आजमितीस कोरोना ओसरू लागला आहे, परंतु रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू केली नाही.
गत दीड वर्षांपासून रेल्वे सुरू नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना एक्स्प्रेसने प्रवास करावा लागतो.
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत कोणतीही सूचना नाही. असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
नियमांकडे दुर्लक्ष
सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी प्रवाशांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले, परंतु रेल्वेचे प्रवासी नियमांकडे कोनाडोळा करीत आहेत.
सर्वाधिक वेटिंग ‘देवगिरी’ला
कोरोना महामारी ओसरू लागली आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लोक देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करतात. त्यामुळे देवगिरीला वेटिंग असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.