मराठा समाजातील माय, बापांनो शांततेत आंदोलन करा, उग्र आंदोलन करु नका. कुणीही आरक्षणासाठी आत्महत्या करु नका, असं आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज केले. आज मराठा समाजाने आरक्षणासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची वेळ आज संपली आहे. यामुळे आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात होणार आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले,कुणबी बांधवांचा व्यवसाय काय आहे, आम्ही त्यात बसतो का हे पाहा आम्हाला आरक्षण मिळायला हवं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आरक्षण कोण देऊ देत नाही याचा शोध घ्यायला पाहिजे. सरकार आरक्षण द्यायला १५ दिवसात तयार होते, आजचा ४१ वा दिवस आहे. मराठा समाजाने शांततेत आरक्षण करायचं आहे, कुणीही उग्र आंदोलन करु नये, कुणीही आरक्षणासाठी आत्महत्या करु नका. मी समाजासाठी उपोषणाला बसणार आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.
राज्यभरात आजपासून साखळी उपोषण सुरू
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे,मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचे अल्टिमेटम दिले होते, आज २४ ऑक्टोबरपर्यंत हे अल्टिमेटम होते. आज अल्टिमेटम संपला आहे. यामुळे आजपासून पुन्हा एकदा साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील आज स्वत: आमरण उपोषणासाठी बसणार आहेत.
मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची शिवछत्रपतींच्या चरणी शपथ, मनोज जरांगे म्हणाले, तरीही...
पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णयही जरांगे पाटील यांनी घेतला आहे. आज ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहे. तर दुसरीकडे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत आरक्षण देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.