शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

धुवाँधार, मुसळधार, संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:55 AM

गेल्या वीस दिवसानंतर जिल्ह्यात पावसाने गुरूवारी जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जालना : गेल्या वीस दिवसानंतर जिल्ह्यात पावसाने गुरूवारी जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पिके माना टाकू लगले असतानाच हा दमदार पाऊस पडल्याने या पिकांना जीवनदान मिळणार आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटले आहेत. मात्र गुरूवारी प्रथमच नदी-नाले ओथंबून वाहिले.गुरूवारी पहाटेपासूनच दमदार पावसाचे पुनरागमन झाल्याने जालनेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जालना शहरासह आठही तालुक्यात या पावसाची सर्वदूर हजेरी असल्याने संपूर्ण जिल्हा ओलाचिंब झाला होता. गुरूवारी जालनेकरांना सूर्यदर्शनही झाले नाही. कधी हलका तर कधी मुसळधार पाऊस बरसल्याने संपूर्ण वातावरणात गारवा निर्माण झाला होता.जालन्यातील कुंडलिका नदीवर असलेल्या रामतीर्थ बंधारा पूर्णक्षमतेने भरल्याने भरून वाहिला. तर नदीलाही पूर आला होता.जालन्यातील अनेक सखल भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जालना शहरासह परतूर, भोकरदन, अंबड, कुंभारपिंपळगाव, घनसावंगी, तीर्थपूरी, बदनापूर, जाफराबाद तसेच मंठा तालुक्यातही दमदार पावसाने हजेरी लावली होती. केदारखेडा परिसरातही मुसळधार पाऊस झाला, राजूर, दाभाडी, टेंभूणी हसनाबाद, वाटूरफाटा, वीरेगाव, रामनगर आदी गावांमध्येही गुरूवारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, या पावसामुळे पिकांप्रमाणेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. जिल्ह्यात सध्या ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही टँकरची संख्या आता कमी होणारआहे.

टॅग्स :RainपाऊसJalanaजालना