लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाठांतर म्हणजे केवळ गणिताचे पाढे पाठ करणे एवढ्यावरच मर्यादित नसते. हे जालन्यातील जालना एज्युकेशन फाऊंडेशन या समाजातील आर्थिक दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांमधून पुढे आले आहे. या फाउंडेशनने इंग्रजी शब्दांचा सचित्र मराठी अर्थ असणारी ५००० शब्दांची डिक्शनरी (शब्दकोष) तयार केला आणि त्यातून विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धा घेतली....ही कामगिरी केली आहे जालन्याच्या गायत्री पांडुरंग निलावार या शाळकरी मुलीने. तिची ही विशेष मुलाखत.पाठांतराची आवड कशी निर्माण झाली ?घरामध्ये आई-वडिलांकडून बालपणीच पाढे पाठ करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. १० ते ३०० पर्यंतचे पाढे यापूर्वीच आपण इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच मुखपाठ केले होते. हल्ली पाढे पाठ करण्यामागे विद्यार्थ्यांचा कल कमी दिसत आहे. परंतु पाठांतर हे कधीच वाया न जाणारी बाब असल्याने आई-वडील, शिक्षकांच्या मदतीने यात आपण रस घेतला. शाळेमध्ये शब्दार्थ (इंग्रजी) पाठांतराची स्पर्धा असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचवेळी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आपण ठरविले होते.किती शब्द पाठ आहेत ?आम्हाला ज्या डिक्शनरीच्या मदतीने शब्दार्थ पाठ करून त्याची परीक्षा घेण्यात येणार आहे, हे सांगितले होते. त्या डिक्शनरीमध्ये जेवढे शब्दार्थ होते, तेवढे सर्वच शब्द आपण पाठ केले. ही परीक्षा ज्यावेळी घेण्यात आली. त्यात १५० पैकी १४९ गुण मला मिळाले. यासाठी दररोज दोन ते तीन तासांचा वेळ आपण शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त या परीक्षेसाठी दिल्यानेच हे शक्य झाले. विद्यार्थ्यांनीही अशा परीक्षा दिल्या पाहिजेत.टीव्ही, मोबाईलपासून राहिले दूरडिक्शनरीतील शब्द पाठ करताना शांतता आणि एकाग्रता हवी असते. त्यामुळे मी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहिले. बालविहार शाळेमध्ये इंग्रजीतून शिक्षण घेतल्याने त्याचाही मोठा लाभ झाला. आई-वडील, मावशी, शाळेतील शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळाल्यानेच हे यश मिळाले.
पाढेच नव्हे... शब्दार्थ पाठांतरामुळे मिळाले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:45 AM