लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून शहरातील ८० हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. तसेच विना परवानाधारक सोळा व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या आहे. अन्न सुरक्षेचे निकष न पाळण्याऱ्या परवानाधारक व्यावसायिकांना त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.कायदेशीर परवाना न घेता शहरात अनेक ठिकाणी लहान मोठे खाद्य पदार्थाचे व्यवसाय सुरू झाले आहे. तसेच अन्न सुरक्षेबाबत परवानाधारक व्यावसायिकांकडून नियम पाळले जात नाही. अन्न व औषध प्रशासनाने अशा परवाना धारक व विना परवाना धारक हॉटेल्स, हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करणाºयावर कारवाई केली आहे. तसेच अन्न सुरक्षेचे निकष न पाळणाºया परवानाधारक हॉटेल्सचीही प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली असून, त्रुटी आढळलेल्या ८० हॉटेलसना त्रुटीची पुर्तता करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. या हॉटेल्सची पुन्हा ङ्खफेरतपासणी होणार असून त्रुटीची पुर्तता न केलेल्या व्यावसायिकांवर परवाने रद्द करण्याची तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त एस.एस देसाई यांनी दिली आहे.नवरात्रीनिमित्त विशेष मोहिम राबविणारनवरात्रीनिमित्त अन्न व प्रशासनाकडून विशेष मोहिम राबविण्यात येणार असून, यात प्रसाद तयार करणाºया दुकानदारांची तपासणी करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. यात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
विना परवानाधारक १६ व्यावसायिकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:36 AM
अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून शहरातील ८० हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. तसेच विना परवानाधारक सोळा व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या आहे. अन्न सुरक्षेचे निकष न पाळण्याऱ्या परवानाधारक व्यावसायिकांना त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाची कारवाई : शहरातील ८० हॉटेल्सची तपासणी