शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची नवी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 16:53 IST

५ सप्टेंबरपासून राज्यभरात विधानसभा मतदारसंघनिहाय घोंगडी बैठक घेणारं.

- पवन पवार वडीगोद्री ( जालना): ''शेतकरी देखील आमचाच आहे. सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी लक्ष द्यायला तयार नाही. आता आम्ही या प्रश्नात लक्ष घालणार, सरकार कसं कर्जमाफी देणार नाही हे आम्ही बघतो,'' असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मराठा आरक्षणानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असताना शेतकरी कर्जमाफीवर जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेने राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळू शकते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जास्त ताकद लावणार, असल्याचेही जरांगे यांनी जाहीर केले. तसेच निवडणुकीचे आणखी नियोजन नाही. राज्यभरात विधानसभा मतदार संघानिहाय घोंगडी बैठक घेणारं. याची सुरुवात ५ सप्टेंबरपासून गेवराई मतदार संघातून होईल. यावेळी आमची भूमिका लोकसंसमोर मांडणार. घोंगडी बैठकीचा समारोप कुठे करायचा यांबाबत समाजाची भूमिका जाणून घेऊ, असेही जरांगे म्हणाले.

आमचं आरक्षण ओबीसीत आहे. दिल्लीशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. त्यांना वेळ काढून न्यायचा होता. सरकार वाटत असलेले पैसे आमचेच आहेत, सरकार काही त्यांचे घर विकून पैसे देत नाही. सरकार आरक्षण देत नाही. चणे आणि रेवड्या देत आहे. आम्ही कट्टर हिंदू आहोत आणि आमचा डीएनए ओबीसींचा आहे एवढंच माहीत आहे, असे जरांगे यांनी निक्षून सांगितले. 

ही लढाई गरिबांची आहे. गरीब कसा मोठा होत नाही ते आपण बघू. माझी मागणी गरिबांना न्याय देण्यासाठी आरक्षण देण्यासाठी आहे. हिंदूच हिंदूला आरक्षण द्यायला विरोध का करतोय. आम्हाला देखील आमचा अभिमान आहे मग लाठ्याकाठ्या मारायलाच मराठा का दिसतो, असा सवाल जरांगे यांनी केला. मराठयांनी आणि शेतकऱ्यांनी लेकराला मोठं करायचा आनंद असावा. आपल लेकरू शेतात काम करत असताना मोठं झालं पाहिजे आणि शेतातून तुम्हाला लोकांनीं खांद्यावर घेऊन गुलाल टाकून मिरवणूक काढत गावात आणायला हवं.

फडणवीस यांनी हेरगिरी करायला ड्रोन ठेवलेरात्री इकडे ड्रोन आले होते ते फडणवीस यांचेच ड्रोन आहेत, त्यांनीच हेरगिरी करायला ड्रोन ठेवले आहेत, असा आरोप करत जरांगे यांनी तुम्ही काहीच करू शकणार नाही, तुमच्या ड्रोनने गोळ्या घातल्या तरी हरकत नाही. मी नसलो तरी माझा समाज तयार आहे, असे आव्हान फडणवीस यांना दिले. आमच्या मागे ईडी लावायला आमच्याकडे मुंबईला जाण्यासाठीचे तिकिटाचे पैसे नाहीत. इथे सगळे अपक्षच उभे राहतील  निवडणूक कशी हे लढणार हे आता सांगणार नाही, अन्यथा फडणवीस यांना तो कळेल, अशी मिश्किल टोलेबाजी जरांगे यांनी केली. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस