त्यामुळे आता आपत्कालीन काळासाठी वेगळे मुहूर्त असणाऱ्या आषाढातही लग्नकार्ये होत आहेत. भौगोलिकदृष्ट्या पूर्वी आषाढ महिन्यात पर्जन्यकाळ असल्याने अंगणात लग्न करणे कठीण होते. तसेच प्रवासाची साधने त्या काळी उपलब्ध नसणे, यामुळे लग्न मुहूर्त दिले जात नव्हते, असे सांगण्यात आले. मात्र, आता लग्न मंगल कार्यालयात होतात व प्रवासही सुखकर झाला आहे. त्यामुळे पंचांग कालातील मुहूर्तासह आपत्कालीन कालासाठी वेगळे मुहूर्त दिले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंडितांकडून असे मुहूर्त काढून दिले जात आहेत. सध्या जिल्ह्यात आषाढातही मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
परवानगी ५० चीच
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वधू व वराकडील मिळून ५० माणसे लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझर वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बरीच लग्ने घरी किंवा सभागृहात होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोरोनामुळे घरीच होतात लग्नसोहळे
n ऐन लग्नसराईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ठरलेली बरीच लग्ने या ना त्या कारणाने पुढे ढकलावी लागली.
n आता कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे होत असल्याने काही जण घरीच लग्न सोहळे उरकून घेत आहेत.